अवघ्या वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईच्या या खेळाडूने सलग ४३२५ मिनिटे फलंदाजी करून रचला हा इतिहास!

क्रिकेटपटूसाठी क्रिकेटच्या मैदानावर टिकून राहणे सोपे नसते. तरीही १९ वर्षीय युवा फलंदाजाने आपल्या नावावर नवा विश्वविक्रम नोंदवला आहे. त्याच नाव आहे, सिद्धार्थ मोहिते सिद्धार्थ च्याआधी हा विश्वविक्रम सहकारी खेळाडू विराग मानेच्या नावावर होता, पण आता या युवा फलंदाजाने सलग ४३२५ मिनिटे नेट सराव करून विश्वविक्रम केला आहे. प्रशिक्षक आणि मार्गदर्शक ज्वाला सिंग यांनी सिद्धार्थला हा विक्रम करण्यात मदत केली.

१९ वर्षीय युवा फलंदाज सिद्धार्थ मोहिते म्हणतो की मी शुक्रवारी रात्रीपासून नेटमध्ये आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, देशबांधव विराग माने याने ३००४.८५ मिनिटे सलग फलंदाजी करून नवा विश्वविक्रम केला आहे. विरागने गोलंदाज आणि गोलंदाजी मशिनचा सामना केला, तर सिद्धार्थ फक्त गोलंदाजांचा बॉलिंग वर सराव केला आहे. सिद्धार्थचा हा विश्वविक्रम करण्यात त्याची प्रशिक्षक आणि मार्गदर्शक ज्वाला सिंग यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे.

सिद्धार्थच्या या रेकॉर्डचा व्हिडिओही बनवण्यात आला आहे. सिद्धार्थने गेल्या आठवड्यातच हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. प्रत्येक तासाच्या सरावानंतर तो ५ मिनिटांचा ब्रेक घेत असे. क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी असाही नियम आहे की फलंदाजीदरम्यान खेळाडू प्रत्येक एक तासानंतर ५ मिनिटांचा ब्रेक घेऊ शकतो. सिद्धार्थ मोहितेचे रेकॉर्डिंग आणि संबंधित कागदपत्रे आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठवण्यात आली आहेत.

तो  म्हणाला ‘मी जे प्रयत्न केले त्यात मला यश मिळाले याचा मला खूप आनंद आहे. मी वेगळा आहे हे लोकांना दाखवण्याचा हा एक मार्ग होता. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, सिद्धार्थ मोहितेला काहीतरी वेगळं करायचं होतं, जे अनेक क्रिकेटर्स करण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याने प्रशिक्षक ज्वाला सिंग यांना नेटमध्ये ४३२० मिनिटे सलग फलंदाजी करण्याची इच्छा सांगितली. सुरुवातीला प्रशिक्षकाने ते गांभीर्याने घेतले नाही, पण आठवडाभरानंतर सिद्धार्थने पुन्हा नव्या जोशाने प्रशिक्षकांकडे विनंती केली.

सुरवातीला प्रशिक्षक म्हणाले तुज्यासाठी हे जरा खडतर असेल पण, तरीही आपण प्रयत्न करू. यातूनच हा इतिहास साध्य झाला. प्रशिक्षक पुढे  म्हणाले की, एके दिवशी सिद्धार्थ आला आणि म्हणाला की सर मला नेटमध्ये ३१२० मिनिटे सलग फलंदाजी करण्याचा विक्रम मोडायचा आहे. मी यापूर्वी कधीच याबद्दल ऐकले नव्हते. त्याने पुन्हा आग्रह केला. त्यानंतर मी ठाण्यात माझी सुविधा देईन, तिथे तो प्रयत्न करू शकेल, असे सांगितले.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप