आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा, पण अशोक मामाची सर्वात फेव्हरेट अभिनेत्री बद्दल जाणून धक्का बसेल..!

मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये आपल्या दमदार आणि विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ! दिनांक ४ जून रोजी अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस संपन्न झाला. आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये अशोक मामांनी अनेक कलाकारांसोबत काम केलेल आहे, यातील काही जुने कलाकार आहेत तर काही नुकतेच या चित्रपट सृष्टी मध्ये नवीन आलेले आहेत. सीने इंडस्ट्रीमध्ये काम करताना प्रत्येक कलाकाराला अशोक मामांसोबत अभिनय करण्याबरोबरच अभिनयाचे धडे देखील गिरवत असतो! परंतु तुम्हाला हे माहित आहे का, आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा यांनी कोणाकडून अभिनयाचे धडे घेतले आहेत? आणि त्यांची आवडती अभिनेत्री देखील कोण होती? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी शेवटपर्यंत हा लेख नक्की वाचत राहा!!

काही दिवसांपूर्वी कॉफी विथ सकाळच्या कार्यक्रमामध्ये अशोक सराफ आले होते. तेव्हा सकाळ या वृत्तपत्राच्या माध्यमासोबत संवाद साधताना ते म्हणाले,

“मी बऱ्याच अभिनेत्रींसोबत काम केले आहे, पण त्यात कोणी जर टॅलेंटेड आणि जिद्दी असेल तर ती म्हणजे रंजना देशमुख!!”

याबद्दलच पुढे सांगताना अशोक मामा सांगतात की,

” काही कलाकार असे असतात ज्यांना एखादी गोष्ट जमत नसेल तर त्यासाठी ते खूप मेहनत घेतात आणि रंजना ही त्यापैकीच एक होती! एखादं कठीण काम समोर आलं की ते काम पूर्ण करण्याची वेगळीच जिद्द तिच्यात होती. ती अतिशय मेहनती आणि गुणी अभिनेत्री होती. विनोद हा तिचा बाज नसूनही ती शिकली व विनोदी अभिनेत्री म्हणून तिने तिचे नाव कमावलं!!”

अशोक सराफ आणि रंजना देशमुख या जोडीला मराठी प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतलेलं! एक काळ होता जेव्हा या दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले आणि ते तितकेच सुपर डुपर हिट देखील झाले. या दोघांच्या अनेक चित्रपटांपैकी काही गाजलेले चित्रपट म्हणजे, बिन कामाचा नवरा, गोंधळात गोंधळ, एक डाव भुताचा, सुशीला, खिचडी त्याकाळात हे चित्रपट खूप गाजले आणि या दोघांची जोडी देखील तेव्हा खूप प्रसिद्ध झालेली

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप