बॉलिवूडची देसी गर्ल आणि हॉलिवूड स्टार निक जोनास यांच्या बहुचर्चित विवाहाला बराच अवधी होऊन गेला आहे. हल्लीच या जोडीने त्यांचे गोड गुपित सर्वांसोबत सोशल मीडियावर शेयर करून गोड धक्का दिला आहे. तो म्हणजे निक जोनास आणि प्रियांका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून एका गोड परीचे आई-बाबा झाले आहेत.
या गोड बातमी नंतर प्रियांका आणि निकचे चाहते त्यांच्या लेकीची झलक पाहण्यासाठी खुपच उत्सुक आहेत! यातच निक सोबत एका बाळाचा फोटो व्हायरल झाला आहे.
प्रियांका-निकने-२२ जानेवारीला सर्वांना गूड न्यूज दिली. त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडयावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हायरल फोटोकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहेत. ज्यात निकच्या कुशीत एक बाळ आहे. निक त्याच्या कपळावर गोड पापा घेतानाही दिसत आहे. हा फोटो पाहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. निकच्या हातातील हे बाळ म्हणजे त्याची आणि प्रियांकाची मुलगी असल्याची चर्चा रंगली आहे.
पण खरी बातमी अशी आहे की हे फोटोतील बाळ निक आणि प्रियांकाचे नाहीये. हा फोटो खूप जुना आहे. काही काळ आधी प्रियांकाने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानंतरच सरोगसीद्वारे आपण आई झाल्याचे तिने जाहीर केले.
“आम्ही नुकतेच बाळाचे स्वागत केल असून आम्ही खूप आनंदी आहोत. सध्या आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे अशा विशेष क्षणी आम्हाला खासगीपणा जपण्याची गरज आहे,” असे प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्रामच्या पोस्ट मधून सांगितले.
सूत्रांच्या नव्या माहितीनुसार, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना त्यांच्या कुटुंबात दोन मुलं हवी आहेत. यूएस वकीलाशी बोलताना प्रियंका आणि निकच्या जवळच्या मित्राने यासंदर्भात खुलासा केला. प्रियांका आणि निक यांना “किमान दोन मुले” हवी आहेत. अशी माहिती त्यांच्या जवळच्या मित्राने दिली. त्यामुळे दोघे लवकरच आपल्या चाहत्यांना पुन्हा गूड न्यूज देतील अशा प्रकारची चर्चा सिनेसृष्टीत रंगताना दिसत आहे.