भुबन बड्याकर म्हणजेच ‘कच्चा बदाम’ गाण्यातून फेमस होणारे कलाकार यांचा झाला अपघात !! प्रकृती चिंताजनक!

‘कच्चा बादाम’ गाण्यामुळे रातोरात स्टार झालेले भुबन बादायकर यांचा सोमवारी रात्री अपघात झाला. पश्चिम बंगालच्या बीरभूमी येथे त्यांच्या कारला अपघात झाला. भुबन बड्याकार यांनी काही दिवसांपूर्वीच एक कार खरेदी केली होती. कार चालवायला शिकत असताना त्यांचा अपघात झाला. सूत्रांकडून येत असलेल्या बातम्यांनुसार या अपघातात भुबन यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

भुबन बड्याकर यांनी नुकतीच एक सेकंड हँड कार खरेदी केली होती. त्यासाठीच आता ते कार चालवायला शिकत होते. कारचा सराव करत असतानाच सोमवारी अचानक त्यांचा अपघात झाला. त्यानंतर त्यांना बीरभूमी स्थित सरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे समजते. यादरम्यान त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी अनेकजण देवाकडे प्रार्थना करत आहेत.

भुबन बड्याकर हे पश्चिम बंगालच्या बीरभूमी जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असे एकूण ५ सदस्य आहेत. उदरनिर्वाह करून घरखर्चासाठी ते घरातील तुटलेल्या वस्तूंच्या बदल्यात शेंगदाणे विकण्याचे काम करत असत. त्यासाठी ते रोज सायकलवर वेगवेगळ्या गावात फिरत शेंगदाणे विकत असत. दररोज ३ ते ४ किलो शेंगदाणे विकून ते दिवसभरात २०० ते २५० रूपयांची कमाई करत.

एकदा असच शेंगदाणे विकता विकता भुबन कच्चा बदाम हे गाणं गात होते. त्यानंतर त्यांचं हे गाणं गात असतानाचा व्हिडिओ एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या व्हिडिओला रिमिक्स करून युट्यूबवर अपलोड करण्यात आले. आणि मग बघता बघता हा व्हिडिओ त्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडिया स्टार्सने यावर वेगवेगळे व्हिडिओ रिल्स बनवून हे गाणं अजूनच फेमस केलं.

या व्हिडिओमुळे गावोगावी फिरून शेंगदाणे विकणारे भुबन एका रात्रीत स्टार बनले. कच्चा बादाम या गाण्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी शेंगदाणे विकण्याचे काम बंद केले. तसेच हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना इतर अनेक शोमध्ये काम करण्यासाठी ऑफर्स ही मिळत आहेत.

एका म्युझिक कंपनीसोबत भुबन यांनी नुकतेच एक कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे. यामध्ये त्यांनी त्या म्युझिक कंपनीसोबत गाणं गायलं आणि व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केला आहे. यासाठी त्यांना चक्क ३ लाख रूपये मिळाले आहेत. याशिवाय नुकतीच पश्चिम बंगाल पोलिसांनी त्यांचा सत्कार केला होता.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप