MS Dhoni IPL Record : काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या १५ व्या सिझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वीच धोनीने चेन्नईचं कर्णधारपद सोडत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच धोनी कर्णधार पदी नसणार. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्या सामन्यापासूनच धोनीची आक्रमक फलंदाजी त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. पहिल्याच सामन्यात धोनीने अर्धशतकी खेळी केली करून सर्वांचे मन जिंकले आहे, त्याशिवाय दुसऱ्या सामन्यात ही जबरदस्त फिनिशिंग टच दिला आहे.
अस म्हणण्यात येतंय की या आयपीएल स्पर्धेत अनेक विक्रम मोडले जातील, पण धोनीने केलेला नवा विक्रम कुणालाही मोडणं शक्य होणार नाही. फिनिशर म्हणून धोनीचा विक्रम पुढील कित्येक दिवस असाच अबाधित राहणार आहे. कारण, धोनीच्या या विक्रमाच्या जवळ एकही खेळाडू अजून पर्यंत पोहोचलेला नाही. डेथ ओव्हर्समध्ये धोनी अक्षरशः गोलंदाजांची पिसे काढतो. तुफान फटकेबाजी करत बघताबघता संघाला मोठी धावसंख्या उभारुन देतो. १५ व्या षटकांपासून धोनीचं आक्रमक रुप या सिझन दरम्यान पाहायला मिळत आहे! यंदा १५ ते २० या षटकात धोनीने सर्वाधिक धावा वसूल केलेल्या दिसत आहेत.
लखनौविरोधातील सामन्यात धोनीने सहा चेंडूत नाबाद १६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान धोनीने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. आयपीएलच्या अखेरच्या षटकात धोनीच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद करण्यात आलेली आहे. आयपीएल इतिहासात डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा धोनीच्या नावावर जमा झाल्या आहेत. धोनीने २० षटकांत आतापर्यंत ६२७ धावांचा पाऊस पाडण्यात यश मिळवले आहे. या आयपीएल इतिहासात २० षटकांत सध्यातरी सर्वाधिक धावा मिळवणारा एकमेव खेळाडू म्हणून धोनीला नावाजण्यांत येत आहे!
धोनी आयपीएलचा सर्वात यशस्वी फिनिशर आहे. अखेरच्या पाच षटकांत धोनी मैदानावर असेल तर संघाला जिंकवण्यासाठी धावांचा डोंगर रचल्याशिवाय राहत नाही, आणि शेवटी गोलंदाजांची फिरकी तर ठरलेलीच. १५ व्या षटकांपासूनच धोनी धावांचा पाऊस पाडायला सुरुवात करतो. अखेरच्या पाच षटकांत सर्वाधिक धावा काढण्याचा मान धोनीच्या नावावर नोंदवल्या गेला आहे. चेन्नईचा माजी कर्णधार धोनीने १५ व्या षटकात ४४४ धावा चोपल्या आहेत. तर १६ व्या षटकात ४८२, १७ व्या षटकात ५७४, १८ व्या षटकांत ६२०, १९ व्या षटकात ६२७ आणि अखेरच्या २० व्या षटकांत धोनीने ६२७ धावांचा पाऊस पाडला आहे.