खराब फॉर्म मध्ये असणाऱ्या टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कप मध्ये स्थान मिळणार नाही का नाही ? यामुळे विराट कोहली सर्वांच्या निशाण्या वर असून हा प्रश्न जोरात उपस्थित होत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने उघडपणे विराट कोहलीचा बचाव केला आहे. मी भारतीय संघात असतो तर विराट कोहली ला संघातून कधीच वगळले नसते, असे पाँटिंग म्हणताना दिसून आला. ICC दिलेल्या मुलाखतीत रिकी पाँटिंग ने विराट कोहली च्या सध्याच्या फॉर्म बद्दल सांगितले. रिकी पॉन्टिंग म्हणाला की, जर तुम्ही विराट कोहलीला वर्ल्ड कपच्या बाहेर ठेवले, त्याच्या जागी कोणीतरी आले आणि त्याच्यासाठी सर्व काही चांगले झाले, तर विराट कोहलीला परत येणे कठीण होईल.
View this post on Instagram
विराट कोहलीच्या फॉर्मवर रिकी पाँटिंग म्हणाला की, जर मी दुसऱ्या संघाचा कर्णधार असतो तर मला भारतीय संघाची भीती वाटेल कारण विराट कोहली संघात आहे. कदाचित तो माझ्या संघात नाही ही माझ्यासाठी चिंतेची बाब ठरली असती. मला माहित आहे की आता त्याच्यासाठी हे कठीण झाले आहे, पण प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत असे घडते. गोलंदाज असो की फलंदाज, कधी ना कधी त्याला अशा टप्प्याचा सामना करावा लागतो.
;
View this post on Instagram
दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू म्हणाला की जर मी भारतीय संघात असतो तर मी विराटसोबत राहिलो असतो कारण मला अशा टप्प्यांत माहिती आहे. प्रशिक्षक-कर्णधार या नात्याने विराट कोहली वरील सर्व दडपण दूर करण्याचा माझा प्रयत्न असेल जेणे करुन त्याला गोष्टींचा आनंद मिळेल आणि धावा काढण्यास सुरुवात होईल. विराट कोहलीला गेली अडीच वर्षे शतक झळकावता आलेले नाही, अलीकडच्या काळात तोही चांगल्या खेळीसाठी प्रत्नात आहे आणि सुरुवाती नंतर बाद होत आहे. त्यामुळेच त्याला कसोटी आणि नंतर टी-२० संघातून बाहेर काढण्याची चर्चा होती.
रिकी पाँटिंग पूर्वी रोहित शर्मा, सुनील गावस्कर, बाबर आझम, जोस बटलर यांच्यासह मोठ्या नावांनी विराट कोहलीला पाठिंबा दर्शवला आहे. विराट कोहलीने अली कडेच इंग्लंड विरुद्ध टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळली आहे. तो सध्या एका महिन्याच्या ब्रेकवर असून वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो टीम इंडिया सोबत नसेल.