टीम इंडियाने आपल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीने केली होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाला अरभावाला सामोरे जावे लागले. भारताने याआधी कसोटी मालिका २-१ ने गमावली आणि त्यानंतर वनडे मालिकेत टीम इंडियाचा ३-० असा सफाया झाला.
भारताने शेवटची वनडे मालिका जुलै २०२१ मध्ये शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळली होती. संघातील बहुतांश वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असताना, बीसीसीआयने तरुणांनी सजलेला भारत ब संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर पाठवला. वर्षभरानंतर हा भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत पूर्णपणे फॉर्मात नव्हता.
आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. या मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. बातमीनुसार, या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन होऊ शकते. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे जो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला होता. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली वनडे मालिका खेळवली जाणार आहे. नियमित कर्णधार म्हणून रोहितची ही पहिली वनडे मालिका असेल. यानंतर तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे
संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा संघात आल्यानंतर काही खेळाडूंचे पत्ते कापले जाणे निश्चित असल्याचे मानले जात आहे.
भारताची मिडल ऑर्डर फ्लॉप, श्रेयसचा पत्ता कट होऊ शकतो भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची मधली फळी. सामन्यातील सर्वाधिक धावा पहिल्या 3 फलंदाज आणि काही गोलंदाजांनी केल्या. अशा स्थितीत रोहित श्रेयसला संघातून काढून टाकू शकतो. ही एकदिवसीय मालिका श्रेयससाठी खूपच निराशाजनक होती. त्याने 3 सामन्यात 18 च्या सरासरीने केवळ 54 धावा केल्या.
या फलंदाजाकडून संघाला खूप अपेक्षा होत्या, ज्या तो पूर्ण करू शकला नाही. अशा परिस्थितीत रोहित त्याच्याऐवजी ऋतुराज गायकवाडला संधी देऊ शकतो. ऋतुराज ओपनरप्रमाणे खेळत असला तरी केएल राहुल, शिखर आणि रोहितला संघात घेणे शक्य नाही, त्यामुळे त्याला मधल्या फळीचा भाग बनवता येईल.
2. या वेगवान गोलंदाजाला संधी मिळणे कठीण
भुवनेश्वर हा एकेकाळी भारताचा सर्वात विश्वासू गोलंदाज मानला जात होता. पण या मालिकेत आणि गेल्या काही काळापासून तो आऊट ऑफ फॉर्ममध्ये दिसत आहे. ती धार त्याच्या गोलंदाजीत दिसत नाही. त्यामुळे त्याला हि बाहेरचा रस्ता खवला जाऊ शकतो.