३ भारतीय क्रिकेटपटू जे एकदिवसीय क्रिकेटमध्ये कधीही आऊट झाले नाहीत..!

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे, म्हणूनच देशांतर्गत ते आंतरराष्ट्रीय खेळाडू हा खेळ खेळतात. त्यामुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळवणे खूप कठीण आहे. खराब कामगिरीनंतर काही जणांना संघातून काढून टाकले जाते, तर काहींना संघात स्थानही मिळत नाही. पण असे काही खेळाडू आहेत जे आजपर्यंत वन-डेमध्ये कधीही बाद झाले नाहीत, तरीही त्यांना नगण्य संधी देण्यात आल्या आहेत.

सौरभ तिवारी: सौरभ तिवारीने २०१० मध्ये भारताकडून तीन एकदिवसीय सामने खेळले होते. त्याच वर्षी२० ऑक्टोबर रोजी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले, जिथे त्याने १७ चेंडूत १२ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला.  सौरभ तिवारी हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे जो मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो. २००८ च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत विजयी संघात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भरत रेड्डी: सय्यद किरमाणी हा भारतासाठी त्यावेळी खेळलेला सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक होता हे बहुतेकजण मान्य करतील. याचा फटका भरत रेड्डी यांना सहन करावा लागला असावा. त्यावेळी किरमाणीचे संघातील स्थान निश्चित झाले होते, त्यामुळेच भरतला अनेक सामने खेळायला मिळाले नाहीत. भारत रेड्डी यांना १९७८ते न ९८१ या कालावधीत भारताकडून तीन एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनदा फलंदाजीची संधी मिळाली आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो अपराजित राहिला. भरत रेड्डीला २० चेंडू खेळायला मिळाले आणि त्याने दोन्ही डावात ११ धावा केल्या. यानंतर भरत रेड्डीला भारतीय संघातून वगळण्यात आले.

फैज फजल: फैज फझलने २०१६ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध ५५ धावांची नाबाद खेळी करून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सलामीवीर म्हणून चांगली खेळी खेळूनही त्याच्याकडे दुर्लक्ष झालेआणि तो अजूनही राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची वाट पाहत आहे. यानंतर त्याला ७ डिसेंबर २०१० रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने ३९ चेंडूत नाबाद  सामन्यांमध्ये ८७ च्या स्ट्राइक रेटने ४९ धावा केल्या आणि या कालावधीत तो कधीही बाद झाला नाही. मात्र त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला कधीही संघाचा भाग बनवले नाही.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप