उत्तराखंड रणजी संघाला गुरुवारी मुंबई (मुंबई) विरुद्ध रणजी ट्रॉफी २०२२ उपांत्य पूर्व फेरीत ७२५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. प्रथम श्रेणी क्रिकेट च्या २५० वर्षां च्या इतिहासातील धावांच्या बाबतीत मुंबई संघाचा हा सर्वात मोठा विजय होता. सामना गमावल्या नंतर उत्तराखंड चा संघ नव्या वादात सापडला आहे. हा वाद इतका वाढला की तेथील क्रिकेट असोसिएशन ला ही स्पष्टी करण द्यावे लागले आहे.
उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन नुसार, खेळाडूं च्या जेवणा वर १.७४ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. खेळाडूंना दैनंदिन भत्ता म्हणून ४९ लाख ५८ हजार रुपये देण्यात आले होते. मिळालेल्या वृत्तानुसार, असोसिएशन ने केळी खरेदी करण्या साठी सुमारे ३५ लाख रुपये आणि पाण्या च्या बाटल्या खरेदी करण्या साठी सुमारे २२ लाख रुपये खर्च केले होते.
🚨 RECORD-BREAKING WIN 🚨
Mumbai march into the #RanjiTrophy semifinals by securing a 725-run victory – the highest margin of win (by runs) – in the history of First-Class cricket. 👏 👏 #Paytm | #MUMvCAU | #QF2 | @MumbaiCricAssoc
Scorecard ▶️ https://t.co/9IGODq4LND pic.twitter.com/Qw47aSLR7v
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 9, 2022
उत्तराखंड च्या राज्य संघा च्या खेळाडूंना फक्त १०० रुपये दैनिक भत्ता दिला जातो, जो सरकारी भत्त्या पेक्षा सुमारे ८ पट कमी आहे. न्यूज ९ नुसार, वरिष्ठ क्रिकेटर साठी दैनिक भत्ता म्हणून १५०० रुपये आहे आणि हा आकडा १००० रुपया पर्यंत कमी होऊ शकतो आणि २००० रुपयां पर्यंत ही जाऊ शकतो परंतु उत्तराखंड च्या खेळाडूंना गेल्या १२ महिन्या पासून १०० रुपये डीए म्हणून दिला जात आहे.
Uttar Pradesh march into the #RanjiTrophy semifinals! 👏 👏
Captain Karan Sharma leads the charge with the bat in the chase as Uttar Pradesh beat Karnataka by 5⃣ wickets in #QF3. 👍 👍 #KARvUP | @Paytm
Scorecard ▶️ https://t.co/UDFkFRkMjB pic.twitter.com/AtKOP4paDi
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 8, 2022
उत्तराखंड रणजी संघा च्या एका वरिष्ठ खेळाडू ने व्यवस्थापकाला थक बाकी बद्दल विचारले तेव्हा त्याने हे उत्तर दिले होते. अहो, हे प्रश्न वारंवार का विचारता, भाऊ? तुम्हाला पैसे मिळतील. तो पर्यंत स्विगी- झोमॅटो वर ऑर्डर करा.