एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट हे असे फॉरमॅट आहेत जिथे फलंदाजाचा स्ट्राइक रेट महत्त्वाचा असतो. जेव्हा एखादा फलंदाज वेगाने धावा करतो तेव्हा तो आपल्या संघासाठी विजयाचा रोडमॅप तयार करतो. कसोटी क्रिकेट मध्ये फलंदाजाच्या स्ट्राईक रेटला जास्त महत्त्व नसते.
क्रिकेटच्या या फॉरमॅट मध्ये म्हणजेच ७० आणि ८० च्या दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजाचा स्ट्राईक रेट इतका दिसत नव्हता, पण जसजसे वन-डे क्रिकेट पुढे सरकत गेले, तसतसे फलंदाजांच्या स्ट्राईक रेटचे महत्त्वही वाढत गेले होते. एकदिवसीय क्रिकेट मध्ये ही फलंदाजांचा स्ट्राईक रेट ८० च्या पुढे जाऊ लागला होता. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या वनडेच्या इतिहासात असे काही मोठे फलंदाज आहेत ज्यांचा स्ट्राईक रेट कमी आहे.
अजय जडेजा – ६९.८१
माजी फलंदाज अजय जडेजाचे नाव भारतीय क्रिकेट संघातील मोठा सामना विजेता म्हणून घेतले जाते. अजय जडेजाने भारतीय क्रिकेट संघासाठी दोन्ही फॉरमॅट खेळले आहे पण तो एकदिवसीय फॉरमॅट मध्ये मधल्या फळीतील मजबूत फलंदाज मानला जात असे. त्याने मधल्या फळीत भारतासाठी अनेक आकर्षक खेळी खेळल्या आहेत. त्याच्याकडे आक्रमक फलंदाज म्हणून पाहिले जात असले तरी एकदिवसीय क्रिकेट मधील त्याचा स्ट्राइक रेट खूपच कमी राहिला आहे. अजय जडेजाने भारतासाठी १९६ एकदिवसीय सामने खेळले ज्यात त्याने ५३५९ धावा केल्या परंतु त्याचा स्ट्राइक रेट फक्त ६९.८१ होता.
राहुल द्रविड – ७१.१८
भारतीय क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांचा उल्लेख केला की, माजी फलंदाज राहुल द्रविडचे नाव सर्वांच्या जिभेवर येते. राहुल द्रविडने भारतीय क्रिकेट संघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले आणि अनेक संस्मरणीय विजय मिळवले आहेत. राहुल द्रविडला ज्याप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये महत्त्वाचा मानला जात होता, त्याचप्रमाणे तो एकदिवसीय क्रिकेटमध्येही भारतीय संघासाठी खूप मोठा फलंदाज मानला जात होता. राहुल द्रविडने भारतासाठी ३४४ सामने खेळले ज्यात त्याने १०८८९ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या बाबतीत द्रविड फारसा चांगला नव्हता आणि या दरम्यान त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट ७१.१८ होता.
वीवीएस लक्ष्मण- ७१.२
माजी अनुभवी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हा भारतीय क्रिकेट संघातील कसोटी फलंदाज म्हणून ओळखला जातो. व्हीव्हीएस लक्ष्मणने आपल्या कसोटी कारकिर्दीत ज्याप्रकारे कामगिरी बजावली त्यामुळे तो भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज मानला जातो. तसे, लक्ष्मणलाही भारताकडून एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली होती. व्हीव्हीएस लक्ष्मण भारतासाठी ८६ एकदिवसीय सामने खेळण्यात यशस्वी झाला ज्यात त्याने २३३८ धावा केल्या आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मणला वेगवान फलंदाजी करता आली नाही, ज्यामुळे त्याची वनडे कारकिर्दीतील सरासरी केवळ ७१.२ आहे.