भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या च्या घरी एक लहान पावना आला आहे. कृणालची पत्नी पंखुरी शर्मा हिने मुलाला जन्म दिला आहे. क्रुणालने हा आनंद सोशल मीडिया वर शेअर केला आहे. त्याने मुलगा आणि पत्नी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. IPL २०१७ चे विजेतेपद जिंकल्या नंतर कृणाल पंड्याने पंखुरीला प्रपोज केले होते. क्रुणाल मुंबई इंडियन्स चा भाग होता आणि अंतिम सामन्यात त्याला सामना वीर म्हणूनही गौरविण्यात आले. दोघांनी ही त्याच वर्षी २७ डिसेंबरला लग्न केले होते.
कृणाल पांड्या ने आपल्या मुलाचे नाव कवीर कृणाल पांड्या असे ठेवले आहे. त्याची पोस्ट टाकल्या नंतर सोशल मीडिया वर अभिनंदनाचा ओघ सुरू झाला आहे. वेस्ट इंडिज मध्ये टीम इंडियाचे कर्णधार असलेल्या शिखर धवन पासून ते केएल राहुल पर्यंत सर्वांनी पंखुरी आणि क्रुणालचे पालक बनल्या बद्दल अभिनंदन केले आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्याने हार्ट इमोजी कमेंट केली आहे. कॅप्शन मध्ये त्याने मुलाचे नाव लिहिले आहे कवीर कृणाल पंड्या.
Kavir Krunal Pandya 🌎💙👶🏻 pic.twitter.com/uitt6bw1Uo
— Krunal Pandya (@krunalpandya24) July 24, 2022
कृणाल पंड्या हा भारतातील आघाडी च्या अष्टपैलू खेळाडूं पैकी एक आहे. सध्या हा खेळाडू कोणत्याही भारतीय संघाचा भाग नाही. क्रुणालने २०१८ मध्ये भारता साठी T-२० आणि २०२१ मध्ये ODI मध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्ता पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरा वर पाच एकदिवसीय आणि १९ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने वनडे मध्ये १३० धावा आणि २ विकेट्स आणि टी-२० मध्ये १२४ धावा आणि १५ बळी घेतले आहेत. या अष्टपैलू खेळाडू ने गेल्या वर्षी भारता साठी शेवटचा सामना खेळला होता.
भारतीय अष्टपैलू खेळाडू ने चालू हंगामात इंग्लंड च्या देशांतर्गत स्पर्धा, रॉयल लंडन कप मध्ये खेळण्या साठी वॉर्विकशायरशी करार केला आहे. तिकडे कृणालला वनडेत चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करायला नक्कीच आवडेल. वॉर्विकशायर कडून खेळण्याची उत्सुकता व्यक्त करताना तो म्हणाला, कौंटी क्रिकेट खेळण्याची आणि वॉर्विकशायर सारख्या ऐतिहासिक क्लबचा भाग बनण्याची संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. क्रिकेट खेळण्या साठी एजबॅस्टन हे एक खास ठिकाण आहे आणि मी त्याला माझे घर म्हणण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.