RR vs RCB सामन्यात एकूण १८ ऐतिहासिक रेकॉर्ड झाले, जोस बटलरने इतिहास रचला आणि रजत पाटीदारने चमत्कार केला..!

IPL 2022 चा दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ गडी राखून पराभव करत आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे.

विजयाचा हिरो ठरलेल्या जोस बटलरने धमाकेदार कामगिरी केली. जोस बटलरने ६० चेंडूंचा सामना केला आणि १७६ च्या स्ट्राईक रेटने १०६ धावांची तुफानी खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटने १० चौकार आणि ६ षटकार मारले.

View this post on Instagram

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals)

या सामन्यांमध्ये तब्बल १८ रेकॉर्ड ब्रेक झाले.

१ . सुरेश रैना आणि केन विल्यमसन नंतर रजत पाटीदार हा आयपीएल हंगामातील एलिमिनेटर आणि क्वालिफायर २ मध्ये ५०+ धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.
२. आयपीएल प्लेऑफमध्ये एका हंगामात सर्वाधिक धावा
170 – रजत पाटीदार (2022)*३. मोहम्मद सिराज आयपीएलच्या इतिहासात एका मोसमात ३० षटकार मारणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
४. विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नरनंतर जोस बटलर हा IPL हंगामात ७५०+ धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.
५. विराट कोहलीने T20 क्रिकेटच्या इतिहासात १५०झेल पूर्ण केले.
६. वानिंदू हसरंगाने गेल्या ७ डावात ६ वेळा संजू सॅमसनची विकेट घेतली आहे.
७. वानिंदू हसरंगाकडे आता आयपीएलसाठी पर्पल कॅप आहे.
८. जोस बटलरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ४ शतकांसह २०+ पन्नास अधिक धावा पूर्ण केल्या आहेत.
९. ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये १२५ षटकार पूर्ण केले आहेत.
१०. आयपीएल सीझनमध्ये सर्वाधिक ५०+ स्कोअर


11 : विराट कोहली २०१६
०९ : डेव्हिड वॉर्नर २०१६
०९ : डेव्हिड वॉर्नर २०१९
०८ : ख्रिस गेल २०१२
०८ : केन विल्यमसन २०१८
०८ : जॉस बटलर २०२२
११. संजू सॅमसनने आज आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून 50 झेल पूर्ण केले.
१२. रजत पाटीदारने आज T20 क्रिकेटमध्ये ५० षटकार पूर्ण केले.
१३. जॉस बटलरने आज T20 क्रिकेटमध्ये ३५० षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा तिसरा खेळाडू ठरला.
१४. रजत पाटीदारने आज T20 क्रिकेटमध्ये १०० चौकार पूर्ण केले.
१५ . संजू सॅमसनने आयपीएलमध्ये ३५०० धावा पूर्ण केल्या.
१६. प्रसिद्ध कृष्णाने आज त्याचा ५० वा आयपील सामना खेळला.
१७. आयपीएलच्या एका मोसमात ३० षटकार मारणारा वानिंदू हसरंगा इतिहासातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.
१८ . जॉस बटलरने एकाच सत्रात ४ शतके झळकावून विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप