भुवनेश्वर कुमारच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे, जाणून घ्या काय आहे तो अनोखा विक्रम..!

IPL २०२२ च्या २१ व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) ची सुरुवात खराब झाली होती. त्यांचा एक विश्वासू गोलंदाज आणि भारताचा स्टार खेळाडू भुवनेश्वर कुमार ने पहिल्या षटकात १७ धावा दिल्या ज्यातील ५ धावा फक्त बॅटमधून निघाल्या. भुवी च्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

भुवनेश्वर ने त्याच्या षटकात काही फ्रीच्या धावा दिल्या. या षटकात त्याने वाईड बॉल वर ५ धावा दोनदा दिल्या. त्याचे दोन्ही बॉल कीपरच्या आवाक्या बाहेर होते किपरही हा बॉल अडवू शकत न्हवता. कर्णधार केन विल्यमसन ही फक्त पाहण्या शिवाय काहीच करू शकला नाही.

हैदराबाद साठी डावा च्या सुरुवातीला सर्वाधिक धावा देण्याच्या बाबतीत भुवनेश्वर कुमार ने डेल स्टेन ची बरोबरी केली आहे. हैदराबाद कडून खेळताना स्टेन ने २०१५ मध्ये पहिल्या षटकात १७ धावा दिल्या होत्या. त्यावेळी विरोधी संघ आरसीबी होता. आता भुवनेश्वर कुमारने ही स्टेनची बरोबरी केली आहे.

डावा च्या सुरुवाती च्या षटकात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम डेल स्टेन आणि भुवनेश्वर कुमार या दोघांच्या नावा वर आहे. दोघांचे नाव पहिल्या स्थानावर असले तरी भुवनेश्वर कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत भुवीचे नाव दोनदा टॉप टू मध्ये आले आहे असे म्हणता येईल. २०१६ मध्ये भुवनेश्वर कुमार ने केकेआर विरुद्ध हैदराबाद साठी पहिले षटक टाकताना १३ धावा खर्च केल्या होत्या.

गुजरात विरुद्ध च्या पहिल्या च षटकात इतक्या धावा दिल्या नंतर भुवी ने जोरदार पुनरागमन करत शुभमन गिलला बाद केले होते. दुसऱ्या षटकात त्याने आपली लाईन आणि लेन्थ सुधारली आणि त्याला एक विकेट मिळाली. गिलचा झेल राहुल त्रिपाठी ने पकडला होता. आयपीएल मध्ये आता पर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकण्यात गुजरातचा संघ यशस्वी ठरला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघा ने ७ गडी गमावून १६२ धावा केल्या होत्या.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप