आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ कमाईच्या बाबतीत KGF-२ ला मागे टाकू शकतो! हे आहे कारण..!

बॉलिवूड चा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा अभिनेता आमिर खान त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटा मुळे बऱ्याच दिवसा पासून चर्चेत आहे. या अभिनेत्या च्या चित्रपटा च्या प्रदर्शना ची प्रेक्षक बऱ्याच दिवसां पासून आतुरते ने वाट पाहत आहेत. यादरम्यान, निर्मात्यांनी अखेर चित्रपटा च्या उत्सुक प्रेक्षका साठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. अहमदाबाद येथे रविवारी झालेल्या आयपीएल फायनल सामन्या दरम्यान आमिर खान आणि करीना कपूर यांनी चित्रपटा चा ट्रेलर प्रदर्शित केला होता.

आमिर खानचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ यावर्षी ११ऑगस्टला रिलीज होणार आहे. असे म्हटले जात आहे की बॉक्स ऑफिस कलेक्शन च्या बाबतीत हा चित्रपट KGF-२ ला ही मागे सोडू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत की चाहत्यांचा असा दावा करण्या मागे काय कारण आहे? आमिर खानचा शेवटचा चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ फ्लॉप ठरला होता, त्यानंतर आता लाल सिंह चड्ढा या चित्रपटा कडून लोकांना खूप आशा आहेत.

चित्रपट हिट होण्या मागचे पहिले मोठे कारण म्हणजे आमिर खान ने त्याच्या चाहत्यांना दीर्घकाळ वाट पाहण्यास भाग पाडले आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान २०१८ साली रिलीज झाला होता आणि तेव्हा पासून आमिर खानचा एकही चित्रपट आलेला नाही. अशा परिस्थितीत आमिरला त्याच्या चाहत्यांची साथ मिळण्याची शक्यता आहे.

आमिर खान आणि करीना कपूर याआधी ‘३ इडियट्स’ चित्रपटात एकत्र दिसले होते. या जोडीला चाहत्यांनी पसंती दिल्याचा पुरावा ‘तलाश’ चित्रपटा च्या प्रदर्शना दरम्यान दुसऱ्यांदा पाहायला मिळाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा चाहते या जोडी वर प्रेमाचा वर्षाव करतील अशी शक्यता असून तिकीटांची जोरदार विक्री होऊ शकते.

आमिर खान ने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मध्ये फ्लॉप झाल्या नंतर नवीन कथा वापरण्या ऐवजी रिमेकचा पर्याय निवडला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा हॉलिवूड चा सुपरहिट चित्रपट फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे जी तेथे खूप चालली होती. याशिवाय हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे, त्यामुळे तिकीट अधिक विकले जाऊ शकतात.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप