एबी डिव्हिलियर्सने दिनेश कार्तिकला सांगितले ३६० डिग्रीचा खेळाडू, आयपीएल मध्ये परतल्यावर केले मोठे विधान..!

IPL १५ मध्ये दिनेश कार्तिक चे नाव प्रत्येक खेळाडू च्या जिभेवर आहे. गेल्या ६ सामन्या मध्ये त्याने चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स ही त्याचे कौतुक करत आहे.  याशिवाय त्याने स्वतः परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या जाणार्‍या पहिल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, कार्तिकची फलंदाजी पाहून मी थक्क झालो. आयपीएल च्या दुसऱ्या टप्प्या नंतर तो एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. इंग्लंड मध्ये ही तो कॉमेंट्री करत होता.

या दरम्यान तो पुढे म्हणाला की तो ३६० डिग्रीचा खेळाडू आहे. त्याला पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये परतायचे आहे. कार्तिक सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम फॉर्म मध्ये आहे आणि तो एकटाच आरसीबी साठी २-३ सामने जिंकू शकतो. तो ३६० डिग्री फलंदाजा प्रमाणे फलंदाजी करतो. त्याला पाहून मला ही पुन्हा एकदा क्रिकेट मध्ये यायचे आहे आणि क्रिकेट खेळायचे आहे. त्याला असे खेळताना पाहून मला आनंद होत आहे.

दिनेश कार्तिक ने आपल्या कामगिरीने टीकाकारांना उत्तर दिले आहे. त्याने आयपीएल मध्ये आता पर्यंत ६ सामन्यात १९७ धावा केल्या आहेत, तर ५ वेळा नाबाद राहिला आहे. या मोसमात त्याचा स्ट्राइक रेट २०९ आहे. या मोसमात त्याने अर्धशतक ही ठोकले आहे. तुम्हाला सांगतो की, दिनेश कार्तिकने म्हटले आहे की, त्याला पुन्हा एकदा टीम इंडिया मध्ये स्थान मिळवायचे आहे. ज्या नंतर महान फलंदाज सुनील गावस्करनेही त्याला पाठिंबा देत टी-२० विश्वचषकात त्याला स्थान मिळायला हवे असे म्हटले आहे.

२००८ मध्ये कार्तिकने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून पहिला आयपीएल सामना खेळला होता. पहिल्या सामन्यात त्याच्या संघाचा राजस्थान रॉयल्सच्याशी सामना होता. २०११ मध्ये कार्तिकने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून एक सामनाही खेळला होता. २०१२ आणि २०१३ मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून सामने खेळला. त्यानंतर कार्तिकने २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि २०१६ आणि २०१७ मध्ये गुजरात लायन्स संघासाठी सामने खेळले आहेत. २०१८ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाने दिनेशला विकत घेतले होते. या हंगामात तो RCB संघाचा भाग आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप