अबब!! पाकिस्तानी क्रिकेटपटूंना चक्क हॉटेलमधून घालून काढले बाहेर, कारण त्यांनी..!

मित्रांनो, जेव्हा तुम्ही पाकिस्तानी खेळाडू किंवा तेथील क्रिकेटबद्दल विचार करता तेव्हा तुम्ही मॅच फिक्सिंगचा विचार हमखास  करता. कदाचित तुम्हाला मॅच फिक्सिंगबद्दल आठवत ही असेल. पण आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानी खेळाडूंबद्दल वाईट वाटेल अशी काही गोष्ट सांगणार आहोत. आणि हे पाकिस्तानी   क्रिकेटपटूंच्या बाबतीतही त्यांच्याच देशात घडले आहे, त्या घटनेची काही छायाचित्रेही पाहायला मिळाली आहेत.

अलीकडेच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा बदल झाला असून, माजी दिग्गज खेळाडू रमीझ राजा यांची बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून पाकिस्तान क्रिकेटला चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी रमीझ राजा यांनी या पदावर येताच मीडियाशी संवाद साधला आणि अनेक मोठ्या घोषणांसह बदलांचे आश्वासनही दिले आहे. जेव्हापासून रमीझ राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सामील झाला आहे. तेव्हापासून त्याने पाकिस्तान क्रिकेट ला सुधारण्याची इच्छा व्यक्त केली असून, रमीझ राजाला देशांतर्गत क्रिकेटपासून सुरुवात करायची आहे.

पण आता या देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाकिस्तानी खेळाडूंची इज्जत उडताना दिसत आहे. आणि जी घटना समोर येत आहे ती कायद-ए-आझम ट्रॉफीच्या संबंधित आहे. कायद-ए-आझम ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले होते. आणि पाकिस्तानी खेळाडूंना हॉटेलवाल्यांनी हाकलून दिले. दोन्ही संघाच्या खेळाडूंचे सामान बराच वेळ रस्त्यावर पडून होते. कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचे बुकिंग केले न्हवते.

दुसरीकडे, या प्रकरणाशी संबंधित एक मोठा अहवाल समोर आला आहे. जिथे हा खुलासा करण्यात आला आहे, ज्यामध्ये बोर्डाने हॉटेल व्यवस्थापनाला कळवले असल्याचे सांगण्यात आले. तो पर्यन्त त्यांचे सामान रस्त्यावरच पडून होते, जेव्हा हॉटेल मालकांना हे समजले  कि त्यांचे बुकिंग झाले आहे तेव्हा त्यांनी त्यांचे सामान आत मध्ये घेण्याची परवानगी दिली

पाकिस्तान क्रिकेट नेहमीच चुकीच्या बातम्यांमुळे चर्चेत असते, बोर्डातील आपसी वादामुळे खेळाडूंनाही खूप त्रास सहन करावा लागतो. मात्र आता रमीझ राजा आल्यानंतर बदलाची आशा आहे, असे संकेत त्यांनीच माध्यमांशी बोलताना दिले आहेत. यासोबतच त्याने क्रिकेटशी संबंधित काही गोष्टींबाबत नाराजीही व्यक्त केली. अश्या परिस्थित अशी घटना लाजिरवाणी होती. पाकिस्तानचा माजी फलंदाज रमीझ राजाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सडकून टीका करत भारतीय क्रिकेट बोर्डाकडून शिकले पाहिजे असे म्हटले आहे. कारण भारतीय संघाची व्यवस्थापन खूप चांगली आहे असे त्याचे मत आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप