अब्दुल समदने ठोकले रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक, केवळ चौकार आणि षटकारांसह केल्या ८८ धावा..!

सनरायझर्स हैदराबाद संघाचा खेळाडू अब्दुल समद आयपीएल पूर्वी रणजी ट्रॉफी मध्ये दमदार कामगिरी करत आहे. या युवा खेळाडू ने रणजी ट्रॉफी च्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक झळकावल्या नंतर अब्दुल समद चर्चेत आहे. या आधी रणजी ट्रॉफी मध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम पंतच्या नावावर होता जो अब्दुल समदने मोडला आहे.

जम्मू- काश्मीर चा युवा फलंदाज अब्दुल समदने पाँडेचेरी विरुद्ध खेळल्या गेलेल्या रणजी सामन्यात शनिवारी तूफानी शतक झळकावून इतिहास रचला आहे. समदने ७८ चेंडूंचा सामना करत १९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०३ धावा केल्या होत्या. यादरम्यान समदने अवघ्या ६८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे.

रणजी ट्रॉफी मध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम ऋषभ पंत च्या नावावर आहे, त्याने २०१६ मध्ये झारखंड विरुद्ध च्या रणजी सामन्यात दिल्ली कडून खेळताना ४८ चेंडूत शतक पूर्ण केले होते. पंतने त्या सामन्यात ६७ चेंडूत १३५ धावांची तुफानी खेळी खेळली होती, ज्यात त्याने ८ चौकार आणि १४ षटकार मारले होते.

या सामन्या बद्दल बोलायचे झाले तर समदच्या शतकाच्या जोरावर जम्मू-काश्मीर ने पहिल्या डावात ४२६ धावा केल्या होत्या. जम्मू- काश्मीर ने पाँडेचेरी ला पहिल्या डावात ३४३ धावांवर रोखले होते. पाँडिचेरी साठी पारस डोगरा याने शानदार शतक झळकावले होते.

सनरायझर्स हैदराबाद संघाने काही ध’क्कादायक निर्णय घेतले आहेत. हैदराबाद संघाने डेव्हिड वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमार या सारखे दिग्गज खेळाडू वगळता अब्दुल समदला कायम ठेवले होते. आयपीएल २०२१ मध्ये समदला हैदराबाद ने २० लाख रुपयांना विकत घेतले होते आयपीएल मेगा लिलावा पूर्वी सनरायझर्स हैदराबादने राखून ठेवलेल्या तीन खेळाडूं पैकी अब्दुल समद हा एक होता. फ्रँचायझी ने त्याला कायम ठेवण्या साठी ४ कोटी रुपये खर्च केले होते. अब्दुल समद हा आयपीएलमध्ये खेळणारा जम्मू-काश्मीरचा चौथा क्रिकेटपटू आहे. तो त्याच्या तूफानी फलंदाजी साठी ओळखला जातो. त्याने आयपीएल च्या २३ सामन्यात २२३ धावा केल्या आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप