अभिषेक बच्चनच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे त्याला खुद्द जन्म देणारे महानायक अमिताभ बच्चन अर्थात त्याचे वडील आणि त्याची स्वप्नसुंदरी बायको ऐश्वर्या राय बच्चन महानायकाचा मुलगा असून सुद्धा अमिताभ बच्चन या नावासारखं वलय आपल्या भोवती निर्माण करण्यात अभिषेक अपयशी ठरलाय. ते म्हणतात ना बाप प्रसिद्ध असेल तर मुलगा सुद्धा तसाच होईल ही शक्यता खुपच कमी असते. अभिषेकच्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट घडली. अभिषेकच्या आयुष्यात सगळं काही ठीक नसतानाही त्याच्याशी चक्क सर्वांची मनातली स्वप्नसुंदरी एवढंच काय तर तिच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा विश्वसुंदरी हा किताब मिळवणाऱ्या ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला.
View this post on Instagram
अभिषेकच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वपूर्ण घटनांपैकी एक अशी ही घटना म्हणावी लागेल. तर लग्नानंतर एका मुलाखती दरम्यान त्याला असा प्रश्न विचारण्यात आला की, जगातील सगळ्यात सुंदर महिलेशी लग्न झाल्यानंतर आता कसं वाटत आहे? यावेळी अभिषेकने दिलेले उत्तर खरंच कौतुकास्पद ठरले! हे उत्तर त्याला परिपूर्ण नव-याच्या यादीत पहिल्या नंबरवर घेऊन गेले!
ऐश्वर्या रायच्या विश्वसुंदरी किताबामुळे अभिषेक बच्चनला कधीकधी विचित्र प्रश्नांचा सामना करावा लागतो, ज्याची उत्तरे आपल्या खुमासदार शैलीत देताना अभिषेकही पुढे-मागे पाहत नाही.
अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न हे त्याकाळी देखील जगभरात गाजून चर्चेचा विषय ठरलेले लग्न होते. देशभरात अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न यापेक्षा सुद्धा अमिताभ बच्चन यांच्या मुलाचे आणि विश्वसुंदरीचे लग्न म्हणून ते जास्त चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण मीडियाची लाईमलाईट पडणे साहजिक होतेच. तर मग लग्न झाल्या नंतर या जोडीने प्रसिद्ध अशा ओपरा विनफ्रे शो या मध्ये हजेरी लावली आणि त्यावेळी अभिषेकला एक अगदी खाजगी प्रश्न विचारण्यात आला की, “जगातील सर्वात सुंदर स्त्री तुझी बायको आहे. तर अशा स्त्रीशी लग्न करून कसं वाटतंय?” याप्रसंगी आता अभिषेक काय उत्तर देणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आणि या प्रश्नावर त्याने दिलेले उत्तर ऐकून होस्ट ओपरा सुद्धा प्रभावित झाले.
View this post on Instagram
या प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेक म्हणाला की, “जगातील सर्वात सुंदर स्त्री आपली बायको आहे हे पाहून डोळ्यांना खरंच खूप सुख मिळते.” त्याच्या या एकेरी वाक्यावर सगळेच हसायला लागले. पण अभिषेकला एवढेच विचारून सोडतील ते ओपरा कसले? त्यांनी पुढे थोडे चिडवत त्याला विचारले की, “सकाळी अशा सुंदर स्त्रीच्या बाजूला झोपून उठताना पण भारी वाटत असेल ना.” यावर सुद्धा अभिषेकने अत्यंत हजरजबाबीपणे उत्तर देत म्हटले की, “हो खूपच भारी वाटतं आणि मुख्य म्हणजे ती आता जशी दिसते आहे तशीच सकाळी सुद्धा दिसते..तेवढीच सुंदर…मला सुद्धा प्रश्न पडतो की झोपेतून उठल्यावर सुद्धा ही एवढी सुंदर कशी काय दिसते.?”
ओपरा यांनी अभिषेक बच्चनची अजून फिरकी घ्यावी म्हणून त्याला अजून एक गमतीशीर प्रश्न मजेत विचारत म्हटले की, “ऐश्वर्यापेक्षाही सुंदर डोळे असणारी स्त्री या आधी कधी कुठे पाहिली आहेस का?” या प्रश्नावर अभिषेकने एकदम सरळ नकारार्थी मान हलवली आणि ऐश्वर्याकडे इशारा केला. म्हणजे हीच ती पहिली स्त्री आहे असे त्याला या इशाऱ्यातून सुचवायचे होते. अभिषेकने असा इशारा करताच ऐश्वर्या खळाळून हसली आणि म्हणाली की, “तो हुशार आहे, तो नाही असेच उत्तर देणार!”