भारत- श्रीलंका कसोटी सामन्या दरम्यान झाला मोठा अपघात, रोहित शर्माच्या षटकाराने प्रेक्षकाचे नाक मोडले..!

क्रिकेट च्या मैदानात अनेकदा काही विचित्र घटना घडतात. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बेंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या डे- नाईट कसोटी सामन्या दरम्यान अशीच एक घटना घडली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मारलेल्या षटकारा मुळे प्रेक्षकांचे नाक मोडले होते.

खरे तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील बंगळुरू कसोटी सामना शनिवार पासून सुरू झाला होता. दिवस- रात्री च्या सामन्या मुळे प्रेक्षकांना पूर्ण क्षमतेने स्टेडियम मध्ये येण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. प्रत्येक जण आपल्या आवडत्या क्रिकेटर ला पाहण्या साठी आले होते.

मात्र, या दरम्यान रोहित शर्मा च्या चेंडूचा फटका एका प्रेक्षकाला लागला. विश्व फर्नांडो च्या चेंडूवर रोहित शर्मा ने जबरदस्त षटकार मारला आणि तो थेट प्रेक्षक गॅलरीत जाऊन पडला. खोल कॉर्पोरेट बॉक्स मध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या नाकाला चेंडू लागला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा एक्स-रे काढण्यात आला. त्यानंतर त्याचे नाक फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. रोहित शर्माने १५ धावांच्या खेळीत केवळ एक षटकार मारला व त्या मुळे प्रेक्षका चे नाक मोडले.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियम वर खेळवला जात आहे. भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या होत्या, तर श्रीलंके चा संघ पहिल्या डावात १०९ धावांवर बाद झाला होता आणि भारता ने पहिल्या डावाच्या आधारे १४३ धावांची आघाडी घेतली होती. या डे- नाईट कसोटी सामन्यात भारताने रविवारी दुसऱ्या दिवशी ९ बाद ३०३ धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला आणि श्रीलंके समोर विजया साठी ४४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रीलंके ची सुरुवात खराब झाली आणि दिवसाचा खेळ संपला तेव्हा १ बाद २८ धावा होत्या. कुसल मेंडिस १६ धावांवर आणि कर्णधार दिमुथकरुणारत्ने १० धावांवर नाबादआहे. लाहिरू थिरिमाने खाते न उघडता जसप्रीत बुमराह चा बळी ठरला होता. श्रीलंकेला अजूनही सामना जिंकण्या साठी ४१९ धावा करायच्या आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप