बापरे! अभिनेता सनी देओल आहे इतक्या मोठ्या संपत्तीचा मालक,पहा त्याची रॉयल लाईफ स्टाईल!

१९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेताब’ या जबरदस्त ऍक्शन सिनेमा मधून एन्ट्री घेणारा सनी देवोल रातोरात लोकांच्या चर्चेचा विषय बनला.आणि एक उत्तम अभिनेता म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली. धर्मेंद्र यांचा पंजाबी पुत्तर म्‍हणून बॉलीवूडमध्‍ये दणदणीत एन्‍ट्री मिळविलेल्‍या सनी देवोलने स्‍वबळावर सिनेसृष्‍टीत अल्पावधीतच आपले स्‍थान पक्‍के केले होते. गेल्‍या २५ वर्षात विविध भूमिकांमधून दमदार अभिनय करून सनीने आपला स्‍वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग तयार करण्यात यश मिळवले आहे.

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे नाव ऐकले की लगेच चित्रपटातील एका दृश्यात पाकिस्तान मधील हातपंप उखडल्याचा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. सनी देवोलने दमदार भूमिका निभावलेला हा चित्रपट प्रचंड गाजला. ९० च्या दशकात सनी देओल हे नाव ही त्या बरोबरच चांगले गाजले. त्याची डान्स करण्याची वेगळी स्टाईल तसेच डायलॉग बोलायच्या अनोख्या पद्धतीने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. अभिनयासोबतच सनीने दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केले आहे. सध्या तो राजकारणाच्या आखाड्यातही उतरलेला दिसून येतो.

राजकारणात प्रवेश केल्यानंतर सनी देओलची संपत्ती उघड झाली. उमेदवाराच्या फॉर्ममध्ये शिक्षण, संपत्ती इत्यादी माहिती भरावी लागते. तशीच सनी देवोलनेही माहिती भरली आहे. या माहितीनुसार, सनी आणि त्याची पत्नी पूजा देवोल यांच्याकडे मिळून जवळपास ८७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सनी देवोल जवळ २१ कोटी रुपयांची स्थावर तर ६० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे म्हंटले जाते. त्याच्या बँक अकाऊंटला ९ लाख तर घरात २६ लाख रुपये कॅश असल्याचेही यात नमूद करण्यात आले होते.

त्याची बायको पूजा ६ कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेची मालकीण असल्याचे समजते. तसेच तिच्या बँक अकाऊंटला १९ लाख रुपये असून तिच्याजवळ १६ लाख रुपयांची कॅश आहे. सनी आणि पूजा या दोघांवर मिळून ५३ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही माहिती मिळाली. सनीचा ७ कोटी रुपयांचा जीएसटी भरणे बाकी असून त्याच्यावर १ कोटी रुपयांचे सरकारी कर्ज असल्याचेही सूत्रांकडून कळते. पुण्यातल्या त्याच्या जमिनीची किंमत जवळपास १ कोटी ५६ लाख रुपये आहे. त्याच्या अंधेरी मधल्या फ्लॅटची किंमत २ कोटी ४० लाख इतकी आहे.

सनी देओलकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्याकडे २४ लाखांची ऑडी, प्रत्येकी ४१, ७७, २५ लाखांच्या ३ रेंज रोव्हर कार आणि एक टोयोटा क्वॉलिस पण आहे. आपल्या अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती मधून तो दरवर्षी लाखो पैसे कमवतो.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप