महागड्या गाड्या वापरणारी अभिनेत्री नोरा फतेही आहे एवढ्या कोटींची मालकिण..!

दिलबर दिलबर, पछताओगे , साकी साकी या सर्व रिमिक्स गाण्यांमधून आपल्या अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी, एबीसीडी- 2 या डान्स मुव्ही मध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारी, वरून धवन सोबतच्या ‘हाय गर्मी’ या गाण्यातून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री नोरा फतेही!
नोरा फतेहीचे नाव आणि तिचा डान्स आजच्या घडीला कोणाला माहित नसेल हे निव्वळ अशक्य!

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नोरा फतेही जिचे आज सोशल मीडियावर लाखो-करोडो फॅन आहेत. ही नोरा फतेही नेमकं काय काम करते? तिचा बॉलीवुड इंडस्ट्री मधला आजपर्यंतचा प्रवास कसा घडला? ती कोणत्या देशातून आली आहे ? तिची एकूण संपत्ती किती? याबद्दल सर्वसामान्यांना कायमच उत्सुकता असते. म्हणूनच आजच्या लेखात आपण याबद्दल उत्तरं जाणून घेणार आहोत! शेवट पर्यंत लेख जरूर वाचा!

आजच्या घडीला नोरा फतेही एक चांगली अभिनेत्री, नृत्यांगना, उत्तम बेली डान्सर आणि उत्तम मॉडेल म्हणून नावाजलेली आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये आयटम सॉंग किंवा रियलिटी शो मध्ये डान्स जज करण्यासाठी म्हणून तिला खूपच डिमांड आहे ! आतापर्यंत तिने बॉलिवूड असो वा टॉलिवूड या दोन्हीमधील चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयासोबतच बहारदार नृत्याचा जलवा दाखवलेला आहे!

खरंतर नोरा कॅनेडियन डान्सर आहे. तिचा जन्म ६ फेब्रुवारी १९९२ रोजी कॅनडामध्ये झाला. एका मीडिया रिपोर्टनुसार, नोरा कॅनडामधून भारतात फक्त पाच हजार रुपये घेऊन आली होती. पण अभिनय सामर्थ्याच्या जोरावर आज ती करोडोंची मालकीन बनली आहे ज्यामुळे ती तिचे आलिशान आयुष्य जगत आहे.

नोरा फतेहीच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर ती एका गाण्यासाठी एक ते दोन कोटी रुपये घेते. ती चित्रपट, गाणी, जाहिराती, ब्रँड ऍडव्हरटायजिंग आणि सोशल मीडियासारख्या गोष्टींच्या माध्यमातून आज भक्कम कमाई करताना दिसते !

म्हणूनच आजच्या घडीला नोरा फतेही कडे आलिशान कार आहेत. मर्सिडीज बेंझ सीएलए -२०० ची किंमत सुमारे ३५.९९लाख रुपये, फोक्सवॅगन पोलो कारची किंमत सुमारे ९.५९ लाख रुपये आणि होंडा सिटी कारची किंमत सुमारे १२ लाख रुपये आहे.!

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

भारतात आल्यावर नोरा आता मुंबईतील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. भारतात येण्यापूर्वी नोरा कॅनडामध्ये राहत होती, जिथे तिचे स्वतःचे एक घर अजूनही आहे.

नोरा फतेही एक यशस्वी अभिनेत्री, व उत्कृष्ट बेली डान्सर आहे. तिच्या मेहनतीच्या जोरावर तिने चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करत भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिची नेटवर्थ १२ ते १४ कोटींच्या दरम्यान आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप