स्टूडेंट ऑफ दि इयर या चित्रपटातुन झळकणारी आलिया भट तिच्या गोड चेहऱ्यामुळे आणि दमदार अभिनयाच्या जोरावर भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान पटकवण्यात यशस्वी ठरली आहे! राझी, हायवे, टू स्टेट्स, कलंक या चित्रपटांमधून आलियाने आपले अभिनयकौशल्य दाखवत मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे!
View this post on Instagram
आलिया भटने मुख्य भूमिका साकारलेला तसेच बॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शन केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर मंगळवारी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. सध्या सोशल मिडियावर हे पोस्टर तुफान व्हायरल होत असताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये आलीया भट्ट गंगुबाईच्या मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे. चित्रपटाचे नाव पाहिल्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडतो कि हि गंगुबाई काठियावाडी शेवटी आहे तरी कोण? चला तर मग आजच्या या लेखातून हीच माहिती जाणून घेऊयात.
आलीया भट्ट संजय लीला भन्साळी या महान दिग्दर्शका सोबत पहिल्यांदाच काम करणार आहे. यापूर्वी भन्साळी यांनी आलिया भट्ट आणि सलमान खानला घेऊन इंशाअल्लाह या चित्रपटाची योजना आखली होती, पण काही कारणामुळे सलमानने या चित्रपटातून माघार घेत हा सिनेमा सोडला, ज्यामुळे या चित्रपटाचा विषय काहीसा मागे पडला. त्यानंतर काही दिवसांनी संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची घोषणा केली.
लेखक एस हुसैन जैदीचे पुस्तक माफिया क्वीन्स ऑफ मुंबई याच्या नुसार गंगूबाई गुजरातच्या कठियावाड़ भागामधील मूळ रहिवासी होती. ज्यामुळे तिला गंगूबाई काठियावाडी अशी ओळख मिळाली होती. लहान वयामध्ये गंगूबाईला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर पुढे जाऊन एक कुख्यात गु न्हेगार गंगुबाईचा ग्राहक झाला. गंगूबाई मुंबईच्या कामाठीपुरा भागामध्ये तिचा कोठा चालवीत होती. तिथेच गंगूबाईने अनाथ मुले आणि से क्स वर्कर्स यांसाठी बरीच महत्वाची कामे देखील केली असल्याचे समजते.
गंगूबाई काठियावाडीचे खरे नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. गंगुबाईला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. म्हणूनच वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिच्या वडिलांच्या अकाऊंटंटंसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले आणि ती त्याच्या सोबत लग्न करून मुंबईला निघून आली. अभिनेत्री बनण्याची मोठी मोठी स्वप्ने पाहणाऱ्या गंगूबाईला स्वप्नातदेखील वाटले नव्हते कि तिचा पती तिला धोका देऊन फक्त पाचशे रुपयांमध्ये तिला मुंबईत एखाद्या को ठ्यावर विकुन टाकेल .
एस हुसैन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकामध्ये कुख्यात डॉन करीम लालाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकातील नोंदीनुसार लालाच्या टोळीने गंगुबाईवर बलात्कार केला होता. त्यानंतर न्याय मागण्यासाठी गंगूबाईने करीम लालाची भेट घेतली आणि त्याला राखी बांधून आपला भाऊ बनवले. करीम लालाची बहिण बनल्यामुळे कामाठीपुराचा सर्व भाग गंगुबाईच्या हातामध्ये आला. असे म्हंटले जाते कि गंगुबाई कोणत्याही मुलीच्या तिच्या संमतीशिवाय को ठ्यावर कधीच ठेऊन घेत नव्हती.
आलीया भट्टच्या करियरबद्दल बोलायचे झाले तर करण जौहरच्या कलंक या चित्रपटामध्ये ती आपल्याला शेवटची पाहायला मिळाली होती. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट असला तरी तो फ्लॉप झाला होता. त्याआधी ती रणवीर सिंगसोबत गली बॉय या चित्रपटामध्ये दिसली होती. हा चित्रपट मात्र सुपरहिट झाला आणि आलिया-रणवीरच्या जोडीने सर्व प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले!