रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून भारताचा विजयाचा रथ कायम चालू आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग सात मालिका जिंकल्या आहेत. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडे मध्ये टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 1-2 ने जिंकली. यासह रोहित शर्मा इंग्लंडच्या भूमीवर टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. एवढेच नाही तर टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माची विजयी घोडदौड सुरूच आहे.
View this post on Instagram
गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्माची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सात मालिका खेळल्या असून त्या सर्व मालिका आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. रोहित शर्माने भारताला चार टी -२०, दोन एकदिवसीय आणि एका कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला आहे.
याशिवाय रोहित शर्मा हा भारताचा तिसरा कर्णधार आहे ज्याने इंग्लंडच्या भूमीवर द्विपक्षीय मालिका जिंकण्यात यश मिळविले आहे. रोहित शर्मापूर्वी अजरुद्दीन आणि धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडच्या भूमीवर द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली आहे.
T20 विश्वचषक: कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नजरा आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकावर आहेत. या महिन्यात खेळल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा संघात परतणार आहे. भारताने विश्वचषक जिंकावा अशी आपली इच्छा असल्याचे रोहित शर्माने आधीच स्पष्ट केले आहे.