न्यूझीलंड चा कर्णधार आणि महान यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलम याची नुकतीच इंग्लंड क्रिकेट संघा च्या प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रेंडन मॅक्युलम ची इंग्लंड क्रिकेट बोर्डा ने रेड- बॉल क्रिकेट म्हणजेच कसोटी क्रिकेट साठी त्यांच्या संघा साठी नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्या नंतर मॅक्क्युलम आता लवकरच त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे.
ब्रेंडन मॅक्क्युलम ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये कोचिंगचा कोणताही अनुभव नाही, परंतु त्याने २०१९ पासून वेगवेगळ्या T-२० लीग मध्ये वेगवेगळ्या संघा साठी या पदावर काम केले आहे, ज्या मध्ये तो सध्या IPL संघ KKR चा प्रमुख प्रशिक्षक आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम २०१९ पासून आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. यादरम्यान त्याच्या मार्ग दर्शना खाली केकेआर ने गेल्या आयपीएल हंगामात अंतिम फेरीत धडक मारली होती.
Brendon McCullum appointed as head coach of England Men’s Test Team
Read @ANI Story | https://t.co/Ok3w8g2pUa#BrendonMcCullum #ENGLAND #ECB pic.twitter.com/E3dgQVsx6P
— ANI Digital (@ani_digital) May 12, 2022
इंग्लंड च्या कसोटी प्रशिक्षक पदी ब्रेंडन मॅक्क्युलम च्या नियुक्ती वर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यादरम्यान कोलकाता नाइट रायडर्स मध्ये कर्णधार-प्रशिक्षक म्हणून मॅक्क्युलम सोबत दीर्घकाळ काम करणाऱ्या दिनेश कार्तिक ने मोठे वक्तव्य केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स चा माजी कर्णधार दिनेश कार्तिक ने ब्रेंडन मॅक्क्युलम च्या प्रशिक्षक शैली चे कौतुक केले आहे. त्याने मॅक्क्युलम बद्दल एक मोठी गोष्ट सांगितली की ब्रेंडन मॅक्क्युलम चा नकारात्मकतेशी काहीही संबंध नाही.
मॅक्युलम इंग्लंडचा कसोटी प्रशिक्षक बनल्या नंतर दिनेश कार्तिक म्हणाला, त्याच्या सोबत घालवलेल्या वेळेत मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की त्याच्या मध्ये थोडीशीही नकारात्मकता नाही. तो असा आहे ज्याला प्रत्येक गोष्ट सकारात्मक पद्धतीने करायची आहे. जेव्हा बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलम भेटतील तेव्हा इंग्लंड क्रिकेट साठी सकारात्मक गोष्टी कशा करता येतील हे शोधण्याचा प्रयत्न करेल. हे पाहणे खूप मनोरंजक असेल. मॅक्युलम ने केकेआर आणि ट्रिनबागो नाइट रायडर्स चे प्रशिक्षकपद भूषवले आहे. पण रेड बॉल फॉरमॅट मध्ये त्याच्या साठी नवीन भूमिका असेल. हे त्याच्या साठी खूप वेगळे आव्हान असणार आहे.