डेव्हिड वॉर्नरनंतर आता हैदराबादच्या ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने सोडली फ्रेंचायझी, हैदराबाद फ्रेंचायझीवर केले गंभीर आरोप..!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १५ व्या आवृत्तीत, फ्रँचायझी नुकतेच त्यांच्या मास्टर प्लॅन नुसार लिलावाच्या टेबलवर आले होते. पण सनरायझर्स हैदराबाद च्या वतीने त्याच्या सहाय्यक प्रशिक्षकाच्या उलट फ्रँचायझीने कृती केल्याचा आरोप करत फ्रँचायझीला सोडले आहे. यानंतर हैदराबाद फ्रँचायझी पुन्हा एकदा वा’दाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सनरायझर्स हैदराबादचे सहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅटिच याने मेगा लिलावानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ऑस्ट्रेलियन दिग्गज सायमन कॅटिच अलीकडेच हैदराबाद फ्रँचायझी मध्ये सामील झाला होता. पण फ्रँचायझी सोबत आयपीएल मेगा लिलावात योजना योग्य प्रकारे न पाळल्या मुळे त्याने राजीनामा दिला आहे. स्पोर्ट्स वेबसाइट्स नुसार, सायमन कॅटिचने फ्रँचायझी वर गंभीर आरोप केले आहेत की संघा साठी निश्चित केलेल्या नियोजित योजना लिलावात बाजूला सारल्या गेल्या होत्या. त्यामुळे सायमन कॅटिच ने संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सायमन कॅटिच अलीकडेच हैदराबाद फ्रँचायझी मध्ये सामील झाला होता. यापूर्वी २०१९ मध्ये, ऑस्ट्रेलियाचा सायमन कॅटिच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आरसीबीचा प्रशिक्षक होता. त्याच्या सहाय्यक पदाचा राजीनामा दिल्याने आता हैदराबाद फ्रँचायझी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. सनरायझर्स हैदराबाद आयपीएल ची ऑरेंज आर्मी या वेळी सहाय्यक प्रशिक्षका मुळे वादात सापडली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी आयपीएलच्या मध्यावर डेव्हिड वॉर्नरला कर्णधार पदावरून हटवण्यात आल्याने चर्चेत आला होता. यासोबतच फ्रँचायझी ने डेव्हिड वॉर्नरला ही संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले न्हवते.

ट्रेव्हर बेलिस आणि ब्रॅड हॅडिन यांनीही हैदराबादचे प्रशिक्षकपद याआधी सोडले होते. २०२१ नंतर हैदराबादच्या प्रशिक्षकाने राजीनामा देण्याची ही तिसरी वेळ आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण बराच काळ या संघासोबत होता, पण तो आता एनसीएचा प्रमुख बनला आहे. डेव्हिड वॉर्नरही आता संघात नाही. वॉर्नरने २०१६ मध्ये हैदराबाद संघाला चॅम्पियन बनवले होते. केन विल्यमसन २०२२ मध्ये संघाचे नेतृत्व करेल.

हैदराबाद ने पुन्हा फ्रँचायझी मध्ये एकूण २० खेळाडू खरेदी केले आहेत. केन विल्यमसन, अब्दुल समद, उमरान मलिक यांना कायम ठेवण्यात आले आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, जे सुचिथ, श्रेयस गोपाल, एडन मार्कराम, मार्को जेसन, रोमॅरियो शेफर्ड, शॉन अॅबॉट, आर समर्थ, शशांक सिंह, आर. दुबे, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फैजलहक फारुकी यांना लिलावात खरेदी करण्यात आले आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप