गेल्या मंगळवारी झालेल्या एका मुलाखती दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने एक मोठा खुलासा केलेला. याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे ,
‘२०१९ च्या आयपीएल सत्रात खराब कामगिरी झाल्यामुळे मला क्रिकेट सोडून वडिलांसोबत ऑटो चालविण्याचा सल्ला चाहत्यांकडून देण्यात आला होता. मात्र राष्ट्रीय संघाचा तत्कालीन कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी याने त्यावेळी मला मोलाचे मार्गदर्शन करत माझ्या कारकिर्दीला ग्रहण लागण्यापासून रोखले.’ या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या!
View this post on Instagram
२०१९ च्या आयपीएलमध्ये सिराजने आरसीबीकडून नऊ सामन्यात केवळ सात गडी बाद केले होते. आरसीबीला सुरुवातीच्या मॅच मध्ये सहापैकी एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. त्यावेळी संघ शेवटच्या क्रमांकावर गेला होता. सिराज म्हणाला, ‘ज्या लोकांनी तेव्हा मला वारंवार ट्रोल केले तेच आज म्हणतात, ‘तू फार चांगला गोलंदाज आहेस भाई!’ मला मात्र आता कुठल्याही प्रतिक्रिया आल्या तरी वाईट वाटत नाही, किंवा त्यामुळे मी हुरळूनही जात नाही. मी त्यावेळी जसा सिराज होतो तसाच आजही आहे.’
२७ वर्षांच्या सिराजने तेव्हापासून मागे वळून न पाहता आपल्या कारकिर्दीचा मोठा टप्पा गाठला. आरसीबीने रिटेन केलेल्या तीन खेळाडूंमध्ये सिराजचाही समावेश आहे. आयपीएल २०२० मध्ये निभावल्या दमदार कामगिरीच्या बळावर सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान मिळाले. याच्या पदार्पणानंतर ऐतिहासिक गाबा कसोटीत पाच गडी बाद करीत सिराजने संघात आपले स्थान निश्चित केले. मात्र हा दौरा सुरू होताच सिराजच्या वडिलांचे निधन झाले. पण तेव्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मायदेशी परतण्याऐवजी सिराजने संघासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला होता.
View this post on Instagram
माझ्या वडिलांची प्रकृती २०२० पासूनच खालावत होती. मी त्यांच्याशी जेव्हा फोनवर बोलायचो तेव्हा ते माझ्या काळजीने रडायचे. मी त्यांना रडताना पाहून स्वत:ला अपराधी समजत असल्याने त्यांच्याशी बोलू शकत नव्हतो. तेव्हा मला हे पटले की ‘टीका करणारे मागचा संघर्ष बघत नाहीत’ आणि तेव्हा मला आठवते, जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रीय संघात निवड झाली त्यावेळी धोनीने माझा उत्साह वाढविताना सांगितले की, ‘लोक आपल्याबद्दल काहीही बोलत असतील तर त्याकडे डोळेझाक करायला हवी. तू चांगली कामगिरी करशील तेव्हा तुझी प्रशंसाही होईल. खराब कामगिरी झाली तर त्यासाठी वाईट शब्दांचादेखील वापर केला जाईल. येणाऱ्या सर्व प्रतिक्रिया फार सिरिअसली घेऊ नकोस.’
त्यानंतर चांगल्या कामगिरीनंतर माझा फोटो पेपरमध्ये आला की, वडील ते कात्रण कापून जमा करायचे. असा त्यांनी बराच संग्रह केला होता. मी कसोटी पदार्पणात ज्यावेळी रांगेत उभे राहून राष्ट्रगीत गात होतो. त्यावेळी माझ्या मनात विचार आला की, आज वडिलांनी मला भारतीय संघाच्या जर्सीत पाहिले असते तर त्यांना माझा किती अभिमान वाटला असता. त्यांचे शब्द माझ्या कानात सतत घुमत असतात.’
– मोहम्मद सिराज