अर्धशतक केल्या नंतर सूर्यकुमार यादवने केला नमस्कार, रोहित शर्माची प्रतिक्रिया झाली व्हायरल..!

टीम इंडियाने तिसऱ्या आणि शेवटच्या T-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा १७ धावांनी पराभव केला, या विजयासह भारताने तीन T-२० आंतरराष्ट्रीय सामन्यां च्या मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० असा क्लीन स्वीप केला आहे. सूर्यकुमार यादव ला त्याच्या शानदार खेळी साठी सामनावीर आणि मालिका वीर म्हणून गौरवण्यात आले आहे.

या सामन्यात विंडीज संघा विरुद्ध २०९ च्या स्फोटक स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना सूर्याने ३१ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवने आपले अर्धशतक पूर्ण करताना वेगळ्याच पद्धतीने सेलिब्रेशन केले. आपले अर्धशतक पूर्ण केल्या नंतर सूर्यकुमार यादवने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले होते, खेळ पट्टीवर उभे राहून त्याने ड्रेसिंग रूमच्या दिशेने नमस्कार केला. टीमचा कर्णधार रोहित शर्मा स्वतः त्याच्या संपूर्ण टीम सोबत ड्रेसिंग रूममध्ये बसला होता. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. रोहित शर्मा आणि सूर्य कुमार यादव यांचे नाते खूप जुने आहे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्स चा कर्णधार आहे आणि सूर्यकुमार यादव ने त्याच्या हाताखाली खेळून त्याची स्तर खूप उंचावला आहे. याशिवाय रोहितचे दहा वर्षांचे एक ट्विट पुन्हा पुन्हा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने सूर्यकुमार यादवचे कौतुक केले होते.

कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या T-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघात विराट कोहली आणि ऋषभ पंत नव्हते, त्यामुळे सूर्यकुमार यादव ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. सूर्यकुमार यादवने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास समान पातळीवर खेळला आहे आणि खूप प्रभावित केले आहे. उजव्या हाताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने केवळ २७ चेंडूत आपल्या T-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले होते.

यादरम्यान त्याने १ चौकार आणि ५ षटकार मारले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव बाद झाला, पण तोपर्यंत त्याने ३१ चेंडूंत ६५ धावा काढल्या. सूर्यकुमार यादवच्या T-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही आता पर्यंतची सर्वात मोठी खेळी आहे. यापूर्वी त्याने न्यूझीलंड विरुद्ध ६२ धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. या सामन्या बद्दल सांगायचे तर, संघाची धावसंख्या ६६ धावांवर ३ विकेट्स असताना सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला होता. चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेला कर्णधार रोहित शर्मा संघर्ष करत होता आणि मोठा फटका मारण्याच्या नादात तो बा’द झाला.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप