KKR मध्ये सामील झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, मी या क्षणाची खूप आतुरतेने..!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असताना, सर्व खेळाडू टीम बायो- बबल मध्ये सामील झाल्या नंतर त्यांच्या संघात सामील होण्यासाठी तयार आहेत. उजव्या हाताचा फलंदाज श्रेयस अय्यर देखील आयपीएल सुरू होण्या पूर्वी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) बायो- बबल मध्ये सामील झाला आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या मेगा लिलावात केकेआर ने उजव्या हाताच्या खेळाडू ला मोठी रक्कम दिली होती. श्रेयस अय्यरला फ्रँचायझी ने त्याला १२.२५ कोटी रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले होते, आणि त्या नंतर त्याची KKR संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. दिल्ली कॅपिटल्सचा (DC) कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर ने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बायो- बबल मध्ये सामील झाल्या नंतर, केकेआर च्या कर्णधारा ने प्रतिक्रिया दिली आहे की तो संघा साठी महत्त्व पूर्ण योगदान देण्यासाठी उत्सुक आहे आणि म्हणाला की बायो- बबल कालावधी नंतर संघात उपस्थित असलेले सर्व परदेशी आणि भारतीय खेळाडू याना भेटण्या साठी उत्सुक आहे.

मी खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होतो- श्रेयस अय्यर: सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर म्हणाला, माझे कोलकाता वर प्रेम आहे आणि तुमचा कर्णधार तयार आहे. मी खूप दिवसा पासून या दिवसाची वाट पाहत होतो आणि आता माझी प्रतीक्षा संपली आहे, क्वारंटाईन कालावधीतून बाहेर येण्या साठी आणि माझ्या संघातील खेळाडूंना भेटण्या साठी मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. ही भूमिका स्वीकारण्याची आणि संघा साठी माझे योगदान देण्याची ही माझ्या साठी चांगली संधी आहे.

संघातील खेळाडूं बाबत तो म्हणाला, मी आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि अलीकडेच देशांतर्गत क्रिकेट मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंना भेटण्यास उत्सुक आहे. आपल्याला काळासोबत वाटचाल करावी लागेल आणि खेळाचा आनंद घ्यावा लागेल. तो पुढे म्हणाला, आम्हाला खूप मजा घ्यायची आहे. ही एक दीर्घ प्रक्रिया असणार आहे. आपण भूतकाळाचा विचार न करता वर्तमान काळाचा विचार केला पाहिजे. ती संस्कृती खेळाडू भोवती रुजवण्याचा प्रयत्न करायला हवा.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप