केकेआरच्या संघात सामील झाल्यानंतर ‘या मराठमोळ्या क्रिकेटरने’ अशा खास शब्दात व्यक्त केल्या आपल्या भावना!

भारतीय क्रिकेट संघाचा नावाजलेला आणि उजव्या हाताने खेळणारा बेस्ट फलंदाज म्हणजे अजिंक्य रहाणे, हा दिगग्ज क्रिकेटर अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे, यावेळी त्याला आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये एक नवीन संघात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. येत्या आगामी हंगामात हा फलंदाज अशा टीम मध्ये दिसणार आहे, ती टीम म्हणजे ज्यांनी दोन वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकून आपल्या नावावर केली आहे! बरोबर ओळखलंत अजिंक्य रहाणे आता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाचा भाग असणार आहे!

केकेआरने टीम च्या मालकांनी यंदा अनुभवी खेळाडुंना प्राधान्य देत त्यांच्यावर विश्वास ठेवला तसेच अलीकडेच त्यांनी केलेल्या खराब कामगिरीकडे दुर्लक्ष करून त्यांचा संघात समावेश केला आहे. केकेआरने त्याला विकत घेतल्यानंतर अजिंक्य रहाणेनेही यावर आपल्या भावना व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. रहाणेने मेगा लिलावात आपले नाव १ कोटी बेस प्राईससह नोंदवले होते आणि त्याच्यासाठी एकमेव बोली फक्त कोलकाता संघाने लावली होती आणि अशा प्रकारे मूळ किंमतीवरच अजिंक्य KKR चा हिस्सा राहणार आहे!

KKR चा भाग होण्यासाठी रहाणे अतिशय उत्साहित झालेला आहे, अनेक दिग्गज खेळाडू असलेल्या कोलकाता संघामध्ये सामील होने ही खूप आनंददायी गोष्ट ठरली आहे आणि त्याने हीच प्रतिक्रिया दर्शवत आपल्या चाहत्यांसोबत एक व्हिडिओच्या माध्यमातून आपला उत्साह व्यक्त केला आहे. केकेआरने त्याच्या ट्विटर हँडल वरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रहाणे असे म्हणाला की,

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane)

“केकेआर कुटुंबात सामील होण्यासाठी मी खरोखर आनंदी आणि उत्साहित आहे. माझ्यावर हा विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माहीत आहे की गेल्या काही सिझन मध्ये आम्ही खरोखरच चांगली कामगिरी केली आहे आणि मला खात्री आहे की या सीझनमध्ये देखील आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी करू. तसेच, गॅलेक्सी ऑफ नाईट्समध्ये सामील होण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. चिअर्स!”

अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच अनेक हंगाम खेळले असल्याने तसेच त्याला कर्णधारपदाचा अनुभवही असल्याने. अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सला रहाणेमध्ये एक चांगला मार्गदर्शक खेळाडू देखील सापडला आहे, जो इतर युवा खेळाडूंनाही मॅच खेळताना आपल्या अनुभवांच्या साहाय्याने मदत करू शकतो. यावेळी तो केकेआरसाठी खेळताना मॅचची सुरुवात करताना आणि व्यंकटेश अय्यरच्या जोडीदाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप