लता दीदीं नंतर आता या प्रसिद्ध गायकाचा मृ’त्यू!! PM मोदींनी संदेश लिहून व्यक्त केला शोक!

भारताची गानसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लतादीदींच्या दुःखातून संगीतप्रेमी अजून बाहेर ही आले नाहीत तोपर्यंत त्यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे आज दुःखद नि धन झाले आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या नि धनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करून या बद्दलची माहिती दिली आहे. या दुःखद प्रसंगी पीएम मोदींनी ट्विट करून बप्पी दांना श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांचे आज वयाच्या ६९ व्या वर्षी नि धन झाले आहे. काल रात्री बप्पी लहरी यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना जुहू येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथेच बप्पी दा यांनी शेवटचा श्वास घेतला. बप्पी लहरी त्यांच्या वेगळ्या संगीताच्या खास शैली साठी आणि दमदार डिस्को गाण्यासांठी ओळखले जायचे. पण, तुम्हाला हे माहित आहे का, बप्पी हे त्यांचे खरे नाव नव्हते!

एका बंगाली कुटुंबात जन्म झालेले बप्पी लहरी यांचे खरे नाव आलोकेश लहरी असे होते. बप्पी दांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला होता. बप्पी लहरी हे बप्पी दा आणि डिस्को किंग ऑफ इंडिया म्हणूनही अतिशय फेमस होते. बप्पी दा यांच्या वडिलांचे नाव अपरेश लहरी आणि आईचे नाव बन्सरी लहरी असे होते. बप्पी दा यांचा विवाह २४ जानेवारी १९७७ रोजी चित्रानी लाहिरी यांच्या सोबत झाला होता. त्यांच्या मागे आता दोन मुले मुलगी रेमा आणि मुलगा बप्पा आहेत असा परिवार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)

बालपनीपासून असलेल्या संगीताच्या आवडीमुळे पोहोचले जगाच्या कानाकोपर्यात!

बप्पी दा यांना लहानपणापासूनच संगीताची प्रचंड आवड होती. ते लहानपणीच तबला, पियानो, ड्रम, गिटार आणि इतर वाद्य वाजवायला शिकले होते. बप्पी दा यांना असलेली सोन्याची आवड देखील सर्वश्रुत होती, ते नेहमी आपल्या पेहरावासोबत गळ्यात सोन्याची जाड साखळी, हातात सोन्याच्या अंगठ्या घालत असे. याशिवाय ते नेहमी सोनेरी काड्या असलेला मोठा चष्मा देखील घालत असत.

८० च्या दशकापासून झाले आहेत फेमस!! : बप्पी दा यांनी दादू या चित्रपटाद्वारे बंगाली सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच वेळी, नन्हा शिकारी या चित्रपटाद्वारे बॉलीवूड चित्रपटसृष्टीत गाण्यांमध्ये त्यांचे पदार्पण झाले. बप्पी दांची गाणी ८० च्या दशकात अतिशय लोकप्रिय झाली होती. १९७५ मध्ये रिलीज झालेल्या ‘जुक्की’ या चित्रपटातून बप्पी दा यांच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट आला होता. बप्पी लहरी यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून यात त्यांनी पार्श्वगायकाची भूमिकाही केली असल्याचे समजते.

अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत बप्पी दां नी! : हिंदी आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये बप्पी दा यांनी गाणी गायली आहेत. त्यांची अनेक गाणी आजतागायत सुपरहिट झाली आहेत. डिस्को डान्सरसह अशी अनेक गाणी आहेत, जी आजही चाहत्यांच्या ओठावर आहेत आणि भारतात होणाऱ्या प्रत्येक डान्स पार्टीत ही गाणी आवर्जून वाजवली जातात!

बप्पी लहरी हे बॉलीवूड मध्ये पॉप कल्चर आणण्यासाठी म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या सुपरहिट गाण्यांमध्ये बंबई से आया मेरा दोस्त, देखा है मैंने तुझको फिर, रात बाकी बात बाकी, कोई यहां आहा नाचे नाचे, याद आ रहा है, यार बिना चैन कहां रे, दिल में हो तुम आणि काही वर्षांपूर्वी धुमाकूळ घातलेलं ऊ ला ला या गाण्यांचा यात समावेश आहे.

यांच्या जाण्याने आज संगीत क्षेत्राची पुन्हा एकदा मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली!

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप