भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर खेळवला गेला. मालिकेतील तिसर्या कसोटीत पुन्हा एकदा भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत खराब शॉट खेळून बाद झाला, त्यामुळे संपूर्ण मालिकेत त्याला टीकेला सामोरे जावे लागले. दरम्यान, आता भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने ऋषभ पंतला त्याच्या चुकांमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
केपटाऊन कसोटीपूर्वी हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला, ज्यामध्ये त्याने ऋषभ पंतला गोलंदाजांवर हल्ला करण्यापूर्वी खेळपट्टीवर थोडा वेळ घालवण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार न मारता सिंगलवर येऊन बचाव केला पाहिजे, असेही तो म्हणाला. या यष्टीरक्षक फलंदाजाबद्दल बोलताना तो म्हणाला की “पंत हा एक आश्वासक खेळाडू आहे आणि तो भारतीय संघाला एकहाती सामने जिंकून देऊ शकतो. जर एखाद्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने बाहेर जाऊन चांगली आणि सामना जिंकणारी खेळी कोणी खेळली असेल तर तो फक्त पंत आहे.
पण त्याने ज्या प्रकारे खराब फटके मारले आणि आऊट झाला, त्या फटक्यांची गरज नव्हती. तो म्हणाला की जर पंतने खेळपट्टीवर वेळ घालवला असता तर मला वाटते की तो खेळपट्टीवर खेळू शकला असता. आणि भरपूर धावा करून आपल्या संघाला विजय मिळून दिला असता.
“पंतला अधिक संधी मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे कारण तो ज्या दिवशी खेळतो, सामने जिंकतो त्या दिवशी तो मॅचविनर असतो. तसेच राहुल द्रविडला त्याच्याशी शॉट्सच्या निवडीवर बोलावे लागेल. या संपूर्ण मालिकेत आतापर्यंत ऋषभ पंत सतत खराब आक्रमणात्मक शॉट्स खेळून बाद झाला आहे. मालिकेतील निर्णायक सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला ज्या मध्ये भारताला पराभव स्वीकारा लागला.
ऋषभ पंत हा भारतीय संघाचा चमकणारा तारा आहे, ज्याने त्याच्या सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक वेळा स्वत:ला सिद्ध केले आहे आणि आता तो आगामी काळात आपल्या शानदार फलंदाजीने भारतासाठी अनेक सामने जिंकणार आहे. ऋषभ पंतलाही त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अपयश आले आहे, त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. जरी त्याच्या प्रतिभेवर कोणालाही शंका नाही. क्रिकेटची जाण असल्याने आगामी काळात तो नक्कीच भारताचा मोठा खेळाडू होईल, असा विश्वास वाटतो असेही तो म्हणाला.