हैदराबादने चेन्नई विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हैदराबादचा हा निर्णय योग्य ठरला. संघाने ८ गडी राखून सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्जला चौथ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईचा संघ स्पर्धेतील पहिले चार सामने पराभूत झाला आहे.
View this post on Instagram
या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा खूपच निराश दिसला. नाणेफेक हरल्यानंतर चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी केली, मात्र फलंदाजांचा फ्लॉप शो कायम राहिला. चेन्नईचा संघ निर्धारित २० षटकांत केवळ १५४ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने १५५ धावांचे लक्ष्य २ गडी गमावून पूर्ण केले. चेन्नईच्या गोलंदाजांची कामगिरीही चांगली नव्हती आणि हैदराबादच्या फलंदाजांनी झटपट खेळ करत संघाला विजय मिळवून दिला.
View this post on Instagram
असे रवींद्र जडेजाने पराभवानंतर सांगितले कारण : सामना गमावल्यानंतर रवींद्र जडेजा म्हणाला, “गोलंदाजांनी आम्हाला निराश केले, पण संघ २०-२५ धावा कमी करू शकला. आम्ही शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न करत होतो. १५५ धावा हे छोटे लक्ष्य नाही आणि आमचे गोलंदाज विकेट घेण्याचा प्रयत्न करतात करत होते. उद्या आम्ही मेहनत करू. आम्ही कुठे चुकलो आहोत याबद्दल विचार करू . आम्ही व्यावसायिक आहोत आणि आम्हाला कठोर परिश्रम करण्याची, एकत्र राहण्याची आणि मजबूत परत होण्याची खूप गरज आहे ”
चेन्नईने सलग चौथा सामना गमावला : या पराभवासह, CSK ने आता त्यांच्या IPL इतिहासात सलग चार सामने गमावले आहेत. यापूर्वी २०१० मध्ये असे घडले होते, परंतु त्यानंतर संघाने पुनरागमन करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आता चेन्नई दमदार पुनरागमन करू शकणार की नाही हे पाहणे बाकी आहे. सनरायझर्स हैदराबादचे आता २ गुण झाले असून, संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आला आहे. आता संघ आपल्या पुढील सामन्यात गुजरात टायटन्सशी सामना खेळणार आहे.