वनडे मालिका हरल्या नंतर इंग्लंडला मोठा झटका, बेन स्टोक्सने अचानक घेतली निवृत्ती, आता इंग्लंडची अवस्था बिकट..!

इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला कायमचा अलविदा केल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची निराशा झाली आहे. स्टोक्स सध्या जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे, परंतु त्याने लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आश्चर्याचा सर्वाना धक्का बसला. 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळला गेला आणि त्या विश्वचषकाची अंतिम फेरी इंग्लंडने जिंकली. त्या काळात बेन स्टोक्स नसता तर इंग्लंडचा संघ कधीच विश्वचषक जिंकू शकला नसता. स्टोक्सशी निगडित असे अनेक क्षण आहेत जे इंग्लंड क्रिकेट कधीही विसरणार नाही.

View this post on Instagram

A post shared by Ben Stokes (@stokesy)

बेन स्टोक्सने निवृत्ती का घेतली?: आता अनेक चाहत्यांच्या मनात एक प्रश्न धावत असेल की इंग्लंड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? तर आम्ही  तुम्हाला सांगू इच्छितो कि , स्टोक्स दीर्घकाळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही खास करू शकला नाही. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत स्टोक्सला 0, 21 आणि 27 धावा करता आल्या.

View this post on Instagram

A post shared by Ben Stokes (@stokesy)

बेन स्टोक्स सध्या इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार आहे, त्यामुळे आता त्याच्यावर पूर्वी पेक्षा जास्त जबाबदारी आली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर स्टोक्सला कसोटी आणि टी-२० वर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे.

निवृत्तीनंतर बेन स्टोक्सचे विधान: 129 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2919 धावा करणारा तसेच इंग्लंडसाठी 74 विकेट घेणारा बेन स्टोक्स म्हणाला की, “मी मंगळवारी इंग्लंडसाठी माझा शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. कारण मी क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी हा मोठा निर्णय होता. माझ्या मित्रांसोबत इंग्लंडकडून खेळतानाचे सर्व क्षण मी मनापासून जपले. आमचा प्रवास खूप छान होता.”अशी सुंदर भावना स्टोक्स ने व्यक्त करून सन्यास  घेण्याचा निर्णय घेतला. सध्या तरी एवढ्याकमी वयात वनडे मधून निवृत्ती घेणे असा मोठा निर्णय का घेतला असावा यावर आजून स्टोक्सने प्रतिक्रिया दिलेली नाहीये. तसेचपुढील वाटचालीसाठी  भारतीय संघाकडून व सोनिक मराठी कडून स्टोक्स ला खूप खूप शुभेच्या..

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप