दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी केपटाऊन येथे मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताला कमी ओव्हर रेटमुळे त्यांच्या मॅच फीच्या ४० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडवर २८८ धावांचा पाठलाग करताना, भारताचा डाव ४९.२ षटकांत २८३ धावांवर आटोपला, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने मालिका ३-० ने जिंकली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एका निवेदनात म्हटले आहे की, आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीच्या अँडी पायक्रॉफ्टने केएल राहुलच्या संघाला वेळेवर गोलंदाजी न केल्याचा खुलासा केला आहे.
ICC आचार संहितेच्या कलम २.२२ नुसार, जे ओव्हर-रेटच्या प्रकरणांशी संबंधित आहे, खेळाडूंना वेळेत गोलंदाजी करण्यात अपयशी ठरलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या २० टक्के दंड आकारला जातो. भारतीय कर्णधार केएल राहुलने आरोप स्वीकारल्या मुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही. अशाप्रकारे या दौऱ्याच्या अखेरीस भारतीय संघाला दुहेरी धक्का बसला आहे. वनडे मालिका ३-० ने गमावल्यानंतर भारतीय संघाच्या कर्णधारासह सर्व खेळाडूंना आयसीसीने दंड ठोठावला आहे.
India fined for slow over-rate in third ODI https://t.co/SsmaMz7oSl via @ICC
— ICC Media (@ICCMediaComms) January 24, 2022
अंपायर मारायस इरास्मस आणि बोंगानी जेले, तिसरे पंच अल्लाउद्दीन पालेकर आणि चौथे पंच अॅड्रियन होल्डस्टॉक यांनी दंड ठोठावला आहे. क्विंटन डी कॉकच्या १२४ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ४९.५ षटकांत २८७ धावा केल्या होत्या, त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने अनुक्रमे ६१ आणि ६५ धावा केल्या होत्या, तर दीपक चहरने केवळ ३४ चेंडूत ५४ धावा केल्या होत्या. मात्र भारतीय संघ हा सामना चार धावांनी हरला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या यंग ब्रिगेडने प्रत्येक विभागात दिग्गजांनी भरलेल्या भारतीय संघाला थक्क केले आणि कसोटीनंतर एकदिवसीय मालिका जिंकली. मालिका आधीच जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी गमावून २८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ४९.२ षटकांत सर्व विकेट्स गमावून २८३ धावा करता आल्या.
या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघासाठी काहीही चांगले झाले नाही. २०२१ च्या उत्तरार्धात सेंच्युरियन कसोटी जिंकल्यानंतर भारताला जोहान्सबर्ग कसोटी आणि केपटाऊन कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताने कसोटी मालिका २-१ ने गमावली होती. अशाप्रकारे ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताचे येथे कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.