पुष्पा च्या दमदार यशा नंतर अल्लू अर्जुन आता झळकणार या चित्रपटांमध्ये, खूपच धमाकेदार Entry असेल..!

आर्या 2, रुद्रमादेवी यासारख्या भव्य चित्रपटातून चॉकलेट हिरोची भूमिका साकारणारा अल्लू अर्जुन सध्या बॉक्स ऑफिसवर त्याच्या पुष्पा चित्रपटातुन देशभर धुमाकूळ घालताना दिसत आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्लू अर्जुन दक्षिण चित्रपट सृष्टीत उत्कृष्ट भूमिका निभावताना दिसत आहे. त्याच्या नेहमीच्या चित्रपटांतील भूमिकांपेक्षा वेगळे असलेले पुष्पा चित्रपटातील पुष्पा कॅरेक्टरचे बेरिंग त्याने शेवटपर्यंत अगदी भन्नाट जमवले आहे! आणि विशेष म्हणजे ते लोकांच्या पसंतीस देखील उतरले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत तीनशे कोटींचा गल्ला पार केला आहे म्हणूनच वेगवेगळे दिग्दर्शक आता अल्लू अर्जुन सोबत आगामी चित्रपटात त्याला झळकवण्यासाठी वर्णी लावत आहेत.

अल्लू अर्जुन आगामी वर्षात पुष्पा या सिनेमाच्या भाग दोनच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असणार आहे, या चित्रपटाची अधिकृत माहिती येण्या आधीच या चित्रपटाचा बोलबाला दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत होताना दिसत आहे. 2022 च्या अखेरपर्यंत पुष्पा -द रुल हा भाग 2 चित्रपट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

यावर्षीच अल्लू अर्जुनचा आयकन नावाचा बिग बजेट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामध्ये हिरॉईनच्या भूमिकेसाठी पूजा हेगडे आणि कृती शेट्टी असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
पुष्पा सिनेमाच्या दमदार यशानंतर अल्लू अर्जुन ने त्याच्या मानधनात ही वाढ केल्याचा बोलबाला सुरू आहे. तब्बल शंभर कोटीं रुपये तो घेणार असल्याची चर्चा चित्रपट सृष्टीत रंगली आहे. हा सिनेमा दिग्दर्शक ऐटली दिग्दर्शित करणार असून लायका या प्रॉडक्शनचा निर्माता आहे अशी चर्चा सुरू आहे.

दिग्दर्शक बोयापति श्रीनू यांच्यासोबत ‘सरनायडू’ या सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केल्यानंतर यांच्याच आगामी चित्रपटात अल्लू अर्जुन पुन्हा एकदा झळकणार असण्याची चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटाचे नाव जरी जाहीर नसले झाले तरी आयकन या चित्रपटाचे शुटींग संपल्यानंतर अल्लू अर्जुन या प्रोजेक्ट कडे वळणार आहे.

केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या चित्रपटातही अल्लू अर्जुनची वर्णी लागण्याची खबर चित्रपट सृष्टीत वेगाने पसरली आहे.

‘मिर्ची’ ‘भारत ऐने नेनु’ यासारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक कोरतल्ला शिवा हे देखील अल्लू अर्जुन सोबत काम करण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या पसरत आहेत.

दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक मुरुगु दास यांच्या चित्रपटासाठी देखील अल्लू अर्जुनची बोलणी सुरू असून सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे अशा बातम्या येत आहेत.

तर मग मित्रांनो अल्लू अर्जुनच्या आगामी नवीन चित्रपटांबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? या बद्दल अभिप्राय नक्की कळवा!

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप