रोहित-जैस्वाल नंतर कोहलीने दाखवला जलवा , हिटमॅनच्या या खेळीने भारत विजयी भव..!

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना (WI vs IND 1st Test) विंडसर पार्क, Roseau, Dominica येथे खेळला जात आहे. खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानाचा ब्रेक झाला असून भारताने भक्कम आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालच्या शतकांनंतर कोहलीची आगपाखड पाहायला मिळाली. तिघांच्याही खेळीने भारताच्या विजयाचा पाया रचला. वेस्ट इंडिज अजूनही आघाडी घेण्यापासून 244 धावा दूर आहे.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

या सामन्यात (WI vs IND 1st Test) कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 150 धावांत गारद झाला होता. त्याचवेळी भारताने 5 विकेट गमावून 421 धावा करून डाव घोषित केला.  दुसऱ्या इंनिंग मध्ये वेस्ट इंडिज  फक्त १३० धावांमध्ये गारद झाला आहे आणि हा सामना भारताने एकहाती जिंकला.

रोहित शर्माने शहाणपणा दाखवला: खरं तर, वेस्ट इंडिज आणि भारताच्या पहिल्या कसोटीत कर्णधार रोहित शर्माने असा शहाणपणा दाखवला की पहिला कसोटी सामना टीम इंडियाच्या ताब्यात आला आहे. रोहितने चहापानाच्या काही तास आधी ४२१ धावांवर डाव घोषित केला कारण त्याला माहित होते की क्षेत्ररक्षणादरम्यान वेस्ट इंडिजचे खेळाडू खूप थकतील आणि ते नीट फलंदाजी करू शकणार नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

रोहित-जैस्वालनंतर कोहलीचे अर्धशतक: वेस्ट इंडिज आणि भारत यांच्या पहिल्या कसोटीत दोन्ही सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी भारतासाठी शतके झळकावली. कर्णधार म्हणून रोहितने 221 चेंडूंत 10 चौकार-2 षटकारांच्या मदतीने 103 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर जैस्वालने 387 चेंडूंत 1 षटकार-16 चौकारांच्या मदतीने 171 धावा केल्या.

यानंतर या सामन्यात कोहलीचे शतक हुकले. त्याने 182 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकारांच्या मदतीने 76 धावा करून बाद झाला. या सामन्यात  जडेजा 37 धावा करून नाबाद राहिला तर इशान किशन 1 धावावर नाबाद राहिला तर गिल पहिल्या डावात 6 धावा करून बाद झाला.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप