शुभमन गिल फ्लॉप झाल्या नंतर भारतीय समर्थकांनी सोशल मीडिया वरती केले ट्रोल..!

भारतीय क्रिकेट संघाचा सलामी वीर शुभमन गिल इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात फ्लॉप ठरला आहे. रविवारी सामन्याच्या तिसर्‍या दिवशीही संघा मधील संघर्ष सुरूच होता, जिथे पहिल्या डावात भारताच्या ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने २८४ धावा केल्या होत्या.

रोहित शर्मा आणि केएल राहुल च्या अनुपस्थितीत भारताला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी शुभमन गिलवर होती. मात्र या युवा सलामीवीराला आव्हान पेलता आलेले नाही. पहिल्या डावात गिलने चांगली सुरुवात केल्या नंतर अवघ्या १७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्ये वर आपली विकेट गमावली होती. त्याच बरोबर दुसऱ्या डावातही त्याला मोठी खेळी करता आलेली नाही.

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकात शुभमन गिलने एका शानदार ऑफ ड्राईव्ह वर चौकार मारला होता. इंग्लिश गोलंदाज जेम्स अँडरसनने शुभमन गिलला चांगल्या लेंथ च्या चेंडूवर बाद केले, ज्यावर गिल डिफेंस साठी गेला होता. पण बॅटची बाहेरची कड घेत स्लिपवर उभ्या असलेल्या जॅक क्रॉलीच्या हातात चेंडू गेला होता. दोन्ही डावातील निराशाजनक कामगिरी मुळे शुभमन गिलला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप