मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरी नंतर कायरन पोलार्डचा भावनिक पोस्ट झाला व्हायरल, काय म्हणाला घ्या जाणून..!

इंडियन प्रीमियर लीग च्या १५ व्या मोसमात आयपीएल चा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि अनुभवी फलंदाज केरॉन पोलार्ड ची कामगिरी निराशाजनक होती. मुंबई इंडियन्स ने आयपीएल मध्ये ५ वेळा विजेतेपदा वर कब्जा केला आहे. पण हा हंगाम त्यांच्या साठी वाईट स्वप्ना पेक्षा कमी ठरला नाही, जिथे त्यांना गुणतालिकेत शेवट च्या स्थाना वर राहावे लागले होते.

आयपीएलचा हा मोसम ज्या प्रकारे मुंबई इंडियन्स साठी अत्यंत वाईट गेला, त्याच प्रमाणे मुंबई इंडियन्सचा दिग्गज खेळाडू किरॉन पोलार्डचा ही हा मोसम लक्षात न ठेवण्या सारखा ठरला आहे. आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवाती पासून मुंबई इंडियन्स कडून खेळत असलेल्या किरॉन पोलार्डची या मोसमात अत्यंत खराब कामगिरी होती. या मोसमात, तो पूर्ण पणे फलंदाजीशी झुंजला आणि परिस्थिती इतकी बिघडली की गेल्या काही सामन्या साठी तो संघातून बाहेर होता.

View this post on Instagram

A post shared by Kieron Pollard (@kieron.pollard55)

किरॉन पोलार्ड ने या आयपीएल मध्ये खेळल्या गेलेल्या ११ सामन्या मध्ये १५ पेक्षा कमी सरासरी आणि १०७ च्या स्ट्राइक रेट ने १४४ धावा केल्या होत्या. पोलार्ड साठी यापेक्षा निराशाजनक हंगाम कधीच नव्हता. पोलार्ड त्याच्या कामगिरी ने खूपच निराश आहे. आयपीएल संपल्या नंतर काही दिवसांनी त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्या मध्ये त्याने कॅप्शन मध्ये हा सीझन स्वतःसाठी आणि त्याच्या टीम साठी खूप वाईट मानला आहे, सोबतच त्याने मुंबई इंडियन्स सोबत मैदानात उतरतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

किरॉन पोलार्डने इंस्टाग्राम वर कॅप्शन मध्ये लिहिले की, जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला एक संघ म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून हा हंगाम निराशाजनक दिसतो. यामुळे किती नुकसान झाले आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही या २०२२ च्या मोसमातून नक्कीच खूप काही शिकलो आहोत. ते आम्हाला संघ म्हणून किंवा व्यक्ती म्हणून परिभाषित करते. आपल्याला जीवन आणि गोष्टी बदलण्याची संधी आहे हे जाणून आपण आपले डोके उंच ठेवून ते पुढे चालू ठेवतो. मुंबई इंडियन्स आणि चाहते आम्ही २०२२ च्या मोसमाला निरोप देतो. हार्दिक पांड्या आणि गुजरात च्या संघाचे अभिनंदन करतो.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप