बायोपिक पहिल्या नंतर प्रवीण तांबेचे डोळे भरून आले ,व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल इमोशनल!

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत एमएस धोनी आणि कपिल देव यांच्या आयुष्यावर चित्रपट आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला सुद्धा उतरले. आता याच मालिकेत क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार आहे. प्रवीण तांबे ही मुंबईमधल्या एका युवा प्रतिभावान क्रिकेटपटूची गोष्ट आहे. ज्याच्यासाठी क्रिकेटच सर्वकाही होतं.

मुंबईचा स्पिनर प्रवीण तांबे याच्या आयुष्यावरील ‘कौन प्रवीण तांबे’ हा चित्रपट निर्माते8नुकताच प्रदर्शित झाला आहे. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) टीमनं प्रवीण तांबेसोबत या सिनेमाचा स्पेशल शो पाहिला.

मुंबईचा स्पिनर प्रवीण तांबे याच्या आयुष्यावरील कौन प्रवीण तांबे हा चित्रपट हल्लीच प्रदर्शित झाला आहे. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) टीमसोबतं प्रवीण तांबेने या सिनेमाचा स्पेशल शो पाहिला. तांबे केकेआरचा स्पिन बॉलिंग सल्लागार म्हणून काम पाहत आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याबद्दल बोलताना तांबे चांगलाच इमोशनल झाल्याचे दिसून आले. इतकं की त्याला काही मिनिटे बोलता देखील आले नाही!

तांबेनं २०१३ साली वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याने क्रिकेट खेळण्यासाठी कायमच संघर्ष केला. काम आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टींची कसरत करणाऱ्या तांबेला कोणत्याही देशांतर्गत टीममध्ये जागा मिळत नव्हती. असे असतानाही त्याने कधीही हार मानली नाही. अखेर या कष्टाचे फळ त्याला मिळाले. २०१३ साली झालेल्या आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळून सर्वांना आपल्या कामगिरीने चांगलेच प्रभावित केले.

आयपीएल स्पर्धेत २०१३ साली पदार्पण करणारा प्रवीण तांबे राजस्थान रॉयल्ससह गुजरात लॉयन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडूनही खेळला आहे. केकेआर ही त्याची शेवटची आयपीएल टीम होती. सध्या तो केकेआरच्या सपोर्ट स्टाफचा सदस्य बनला आहे. तांबेनं त्याच्या आयपीएल करिअरमधील ३३ मॅचमध्ये ३०.४६ च्या सरासरीनं २८ विकेट्स घेतल्या आहेत.

तांबेनं चित्रपटाचे स्क्रिनिंग झाल्यानंतर छोटसं भाषण केलं. यावेळी त्यानं तुमची स्वप्न कधीही सोडू नका, ती खरी होतात, असे सर्वांना सांगितले. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनंही सिनेमाची प्रशंसा केली. ‘आम्ही बऱ्याच काळापासून या स्क्रिनिंगची वाट पाहात होतो. हा चांगला सिनेमा आहे. गाणी चांगली आहेत. यातील शेवटच्या प्रसंगानं आम्हाला इमोशनल केले.’ असे त्याने सांगितले. अभिनेता श्रेयस तळपदेनं यामध्ये प्रवीण तांबेची भूमिका निभावली आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप