मुंबई इंडियन्सच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये का मिळाले नाही स्थान, रोहित शर्माने सांगितले हे कारण..!

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने शनिवारी सांगितले की, डीवाय पाटील स्टेडियम वर आयपीएल २०२२ च्या त्यांच्या दुसऱ्या सामन्यात त्यांच्या संघाने राजस्थान रॉयल्सने दिलेल्या १९३ धावांचा पाठलाग करायला हवा होता. जोस बटलरच्या ६८ चेंडूत १०० धावांच्या जोरावर राजस्थानने ८ गडी गमावून १९३ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्या साठी मुंबई निश्चित पणे सज्ज होती, मात्र इशान किशन आणि टिळक वर्मा बाद झाल्यानंतर संघाला २३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

सामन्या नंतर रोहित शर्मा म्हणाला, मला वाटले की त्यांनी १९३ धावा पर्यंत मजल मारण्यासाठी चांगली फलंदाजी केली. बटलरने चांगली खेळी खेळली. आम्ही त्याला बाद करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, परंतु मला असे वाटते की त्या खेळ पट्टीवर १९३ धावांचा पाठलाग करता आला असता, खासकर जेव्हा आम्हाला सात षटकांत ७० धावांची गरज होती.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

किशन आणि वर्माच्या अर्धशतका व्यतिरिक्त जसप्रीत बुमराहने चार षटकांत १७ धावांत तीन बळी घेतले होते. त्याचवेळी टायमल मिल्सने ही चार षटकांत ३५ धावा देत तीन बळी घेतले होते. किशन किंवा वर्मा यांनी शेवट पर्यंत फलंदाजी केली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असे रोहित शर्मा याला वाटते.

बुमराहने चांगली गोलंदाजी केली, तसेच मिल्स आणि टिळक यांनी ही चांगली फलंदाजी केली. त्याच बरोबर ईशान ची फलंदाजी ही उत्कृष्ट होती. त्यांच्या पैकी एकाने शेवट पर्यंत फलंदाजी केली असती तर सामना आमच्या बाजूला आला असता असे मला वाटते.

रोहित शर्मा म्हणाला की, मध्य फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला फेब्रुवारी मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध च्या तिसऱ्या T-२० सामन्यात दुखापत झाल्या नंतर त्याला ठीक होण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला आहे. तो आमच्या साठी महत्त्वाचा खेळाडू आहे. एकदा तो तंदुरुस्त झाला की, त्यानंतर तो मैदानात येईल पण त्याने पूर्ण बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे कारण बोटाच्या दुखापती थोड्या गंभीर असतात. मुंबईने आता पर्यंत दोन सामने खेळले असून, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियम वर ६ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार्‍या तिसर्‍या सामन्यात मुंबई आता पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप