भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन T-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने यजमान संघाचा ४९ धावांनी पराभव करत मालिका २-० अशी जिंकली होती. टीम इंडियाने सलग चार टी-२० मालिकेत इंग्लंडचा पराभव केला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्या नंतर भारतीय संघाने २० षटकांत ८ गडी गमावून १७० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या १७ षटकांत १२१ धावांवर गारद झाला होता. या सामन्यात टीम इंडिया साठी रवींद्र जडेजाने ४६ धावा केल्या होत्या.
यादरम्यान तो नाबाद राहिला होता. दुसरीकडे, भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीत भारतासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली आणि १५ धावांत ३ बळी घेतले होते. ब्रिटीशांकडून T-२० मालिका हिसकावून घेतल्या नंतर, भारताचा कर्णधार रोहित शर्माने सामन्या नंतर च्या सादरीकरणा दरम्यान रवींद्र जडेजाच्या कामगिरीचे कौतुक केले होते. सामन्या नंतर च्या सादरीकरणा दरम्यान रोहित शर्मा म्हणाला, इंग्लंडचा संघ केवळ इंग्लंड मध्येच नाही तर सर्वत्र किती चांगला आहे हे आम्हाला माहीत आहे. जिंकल्या वर नेहमीच छान वाटतं. हा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे जो खूप महत्त्वाचा आहे.
View this post on Instagram
आम्ही हे पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करू आणि पुढे काय होईल यावर लक्ष केंद्रित करू. जडेजाने दडपणा खाली शानदार खेळी खेळली, त्याने या मैदाना वर आपल्या शतकाच्या अनुभवाने शांत आणि चांगली खेळी खेळली. पॉवरप्लेचे महत्त्व आम्हाला समजले आहे. पुढच्या सामन्या साठी आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी द्यायची आहे, त्यासाठी आम्ही प्रशिक्षकांशी बोलू.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा सोबत ओपनिंग करण्या साठी क्रीझ वर आलेल्या ऋषभ पंतने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. दोघा मध्ये ४९ धावांची भागीदारी झाली होती. ज्या मध्ये रोहित शर्माने २० चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३१ धावांचे योगदान दिले होते.
दुसरीकडे, भारताकडून पहिल्यांदाच सलामीला आलेल्या ऋषभ पंतने १५ चेंडूंत ४ चौकार आणि एक षटकारा च्या मदतीने २६ धावा केल्या होत्या. भारता कडून भुवनेश्वर कुमारने ३ विकेट घेतल्या आहेत तर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे हार्दिक पांड्या आणि हर्षल पटेल यांनाही हेच यश मिळाले आहे.