आकाश चोप्राने या दोन दिग्गज खेळाडूंना चांगलेच सुनावले, म्हणाला..

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० मालिकेतील तीनही सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने श्रीलंकेचा तिन्ही सामन्यांमध्ये पराभव करून मालिका ३-० ने जिंकली. हे सामने जिंकून भारताने  एक मोठा विक्रमही केला आहे. याशिवाय मालिकेत असे अनेक खेळाडू पाहायला मिळाले त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांनी आगामी भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. या मालिकेत सर्वच खेळाडूंनी आपली दमदार कामगिरी दाखवली आहे, तर दुसरीकडे भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा ने त्यातल्याच काही खालून चांगलेच सुनावले आहे.

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, या मालिकेत व्यंकटेश अय्यरला पाठवण्यात आले होते. पण त्याने आपल्या खेळीचा पुरेपूर फायदा घेतला नाही. संपूर्ण डाव वाया घालवला, कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी दिली जाणार नाही. आणि जेव्हाही संधी मिळेल तेव्हा त्या गोष्टीचा सर्वार्थाने फायदा घ्यावा. परंतु,  व्यंकटेश अय्यर आणि दीपक हुडा यांनी या मालिकेत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला नाही. या काळात जर तुम्ही चूक केली असेल तर तुम्हाला दीर्घकाळ पश्चात्ताप करावा लागेल. आकाशने दीपक हुडाला नेमके तेच सांगितले. त्याने सांगितले की या मालिकेत दीपकलाही संधी देण्यात आली होती, पण दीपकने अतिशय छोटी खेळी खेळी आहे आणि त्याला संधीच सोने करता आले नाही.

You will be KKR's find this season': Venkatesh Iyer reveals senior India  player's surreal prediction ahead of IPL debut | Cricket - Hindustan Times
तो पुढे म्हणाला या मालिकेत त्याने प्रयत्न करायला हवे होते,  माहितीसाठी, वेंकटेशला श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली होती. यादरम्यान व्यंकटेशला तिसऱ्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली, मात्र या संधीचा फायदा उठवता आला नाही आणि अवघ्या ५ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परत गेला. या काळात व्यंकटेशला प्रदीर्घ खेळी खेळण्याची आणि सामना संपवण्याची चांगली संधी होती, पण त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने १६ चेंडूत केवळ २१ धावा केल्या होत्या. पण लवकरच आपली विकेट गमावली, त्यानंतर जडेजा आणि श्रेयस मैदानात आले आणि त्यांनी सामना संपवला. या सामन्यात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती आणि त्यामुळे युवा खेळाडूंचा या मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता, पण काही खेळाडूंना या संधी मिळाल्या.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप