भारतीय संघाचा फिरकी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या जबरदस्त धमाकेदार खेळीने एक मोठा विक्रम केला. त्याने षटकार मारून माजी कर्णधार एमएस धोनीला एका खास रेकॉर्ड मध्ये मागे सोडले.
View this post on Instagram
भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 2 विकेट्सने पराभव केला. प्रथम खेळताना वेस्ट इंडिजने शाई होपच्या उत्कृष्ट शतकाच्या जोरावर 50 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने शेवटच्या षटकात आठ गडी गमावून लक्ष्य गाठले.
भारतीय संघाच्या या विजयाचा हिरो होता अक्षर पटेल. त्याने अवघ्या 35 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यापूर्वी गोलंदाजीतही त्याने विकेट घेतली होती. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. अक्षर पटेल आणि आवेश खान यांनी 8 व्या विकेटसाठी 24 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि आवेश खानने 2 चौकारांसह 10 धावा केल्या.
View this post on Instagram
अक्षर पटेलने पाच षटकार मारून एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला: अक्षर पटेलनेही आपल्या धडाकेबाज खेळीत एक मोठा विक्रम केला. सातव्या क्रमांकावर किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत भारतासाठी धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता ज्याने 2005 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 3 षटकार ठोकले होते. युसूफ पठाणने धोनीच्या विक्रमाची दोनदा बरोबरी केली होती. त्याने 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. अश्या पद्धतीने अक्षर पटेल ने धोनीच्या एका भल्यामोठ्या रेकॉर्ड ला गवसणी घातली आहे. त्याची म्याच मधील फलंदाजी हि खूपच उत्कृष्ट पद्धतीने त्याने केली.
अश्या पद्धतीने अक्षर आणि आवेश खान या दोघांनी मिळून इंडिज च्या हातातील विजय हिसकावून आपल्या हातात घेतला. तसेच सामन्यानंतर अक्षर पटेल ला सामनावीर पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात आले आहे. अश्या पद्धतीने धवन ने ३ Match ची सिरीज २-० ने जिंकून भारताच्या गळ्यात घातली आहे. त्यामुळे श्वान ला हि खूप खूप अभिनदंन. आता तिसऱ्या सामन्यासाठी सोनिक मराठी कडून भारतीय टीम ला खूप खूप शुभेच्या.