अष्टपैलू रवींद्र जडेजा सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. सध्या तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आगामी काही मालिकांमध्ये तो टीम इंडियात पुनरागमन करताना दिसणार आहे. मात्र याआधी भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने आपल्या कामगिरीच्या जोरावर संघातील स्थान पक्के केले आहे. रवींद्र जडेजाला त्याच्या कामगिरीचा हेवा वाटत असल्याचे दिसून आले. त्याचे नुकतेच केलेले ट्विट हे सिद्ध करते.
View this post on Instagram
अक्षरला पाहून रवींद्र जडेजाला हेवा वाटला: वास्तविक, भारतीय अष्टपैलू जडेजाने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट पोस्ट केले आहे. यात जडेजाने लिहिले आहे की, ‘काही बोलू नका. फक्त हसत राहा.” भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात असताना जडेजाचे ट्विट आले. अक्षर पटेलने या सामन्यात चमकदार कामगिरी केली होती.
यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी अक्षर पटेलला रवींद्र जडेजाचा सर्वोत्तम रिप्लेसमेंट म्हणून संबोधण्यास सुरुवात केली. मॅचच्या कॉमेंट्री पॅनलमध्येही अक्षर-जडेजाबाबत चर्चा रंगली होती. मात्र या पॅनलमध्ये जडेजाची वर्णी अक्षरपेक्षा चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून करण्यात आली होती.
Don’t say anything. Just smile😊
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) January 12, 2023
अक्षर पटेलने जडेजाची अनुपस्थिती भरून काढली: अक्षर पटेलने आपल्या कामगिरीने संघ व्यवस्थापनाला खूश केले आहे, यात शंका नाही. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत भारतीय संघासाठी तो एक चांगला पर्याय आहे. अक्षर पटेलच्या क्रिकेट कारकिर्दी बद्दल बोलायचे तर, तो टीम इंडियासाठी आतापर्यंत 8 कसोटी, 46 एकदिवसीय आणि 40 टी-20 सामने खेळला आहे. अक्षरच्या नावावर 8 कसोटी सामन्यात 47 बळी आहेत, ज्यामध्ये त्याने 5 वेळा 5 बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे.
अक्षरने 43 एकदिवसीय डावात 55 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय 349 धावाही केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. अक्षरच्या नावावर T20 फॉरमॅटमध्ये 288 धावा आणि 37 विकेट आहेत. श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावून पटेलने चमकदारपणे दाखवून दिले आहे की तो खालच्या फळीत येताच पहिल्या चेंडूवर धावा करण्यात माहिर आहे.