विकेटकीपरच्या आधारावर सर्व १० आयपीएल फ्रँचायझींची क्रमवारी आहे अशी..!

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाची म्हणजेच टाटा आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्च पासून वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने झाली होती. बर्‍याच काळानंतर या आयपीएल मध्ये १० फ्रँचायझी सामील झाले आहेत. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात सुरुवाती पासूनच यष्टिरक्षकांना मागणी होती.

१० कोलकाता नाईट रायडर्स
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सकडे फक्त दोन विकेटकीपिंग पर्याय आहेत, सॅम बिलिंग्ज आणि शेल्डन जॅक्सन. हे दोन्ही यष्टिरक्षक आयपीएल मध्ये फारसे खेळलेले नाहीत.

९ गुजरात टायटन्स
१० IPL फ्रँचायझी पैकी गुजरात टायटन्स हा एका यष्टिरक्षकाला सामील करणारा शेवटचा संघ होता. मात्र त्यानंतर त्याने रिद्धिमान साहा आणि मॅथ्यू वेड यांना न विकल्या गेलेल्या खेळाडूंमधून संघात सामील केले. लिलावानंतर रहमानुल्ला गुरबाजलाही संघात सामील केले होते.

८ सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबादने मेगा लिलावात निकोलस पूरनला संघात सामील करण्यासाठी १०.७५ कोटी रुपये खर्च केले आहेत. संघातील इतर दोन यष्टीरक्षक विष्णू विनोद आणि ग्लेन फिलिप्स आहेत. मात्र, फ्रँचायझीचा यष्टिरक्षक विभाग पूरनवर अवलंबून असेल.

७ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मध्ये यष्टिरक्षक विभागातील युवा आणि अनुभव या दोन्हींचे मिश्रण आहे. त्यांच्याकडे अनुभवी दिनेश कार्तिकसह अनुज रावत, लावनिथ सिसोदिया आणि फिन ऍलन हे खेळाडू आहेत. दिनेश कार्तिकच्या अनुभवामुळेच आम्ही ही फ्रँचायझी सातव्या क्रमांकावर ठेवत आहोत.

६ पंजाब किंग्स
जॉनी बेअरस्टो पंजाब किंग्जचा प्राथमिक यष्टिरक्षक असेल. त्याला प्रभा सिमरन सिंग आणि जितेश शर्मा यांचाही पाठिंबा असेल. बेअरस्टोला सामना जिंकण्याचा अनुभव आहे, त्यामुळे तो सर्व सामने खेळताना दिसू शकतो.

७ मुंबई इंडियन्स
या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सकडे भारतीय अनुभवी यष्टिरक्षक इशान किशन उपलब्ध असेल. फ्रँचायझीकडे आर्यन जुयाल हा त्याचा बॅकअप आहे. त्यामुळे या यादीत मुंबई इंडियन्स पाचव्या क्रमांकावर आहे.

४ राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्सकडे अनुभवी भारतीय आणि परदेशातील यष्टीरक्षक आहेत. राजस्थानकडे कर्णधार संजू सॅमसन आणि जोस बटलरच्या रूपाने दोन उत्कृष्ट यष्टीरक्षक आहेत.

३ लखनौ सुपर जायंट्स
राजस्थान रॉयल्सप्रमाणे, लखनौ सुपर जायंट्समध्ये एक भारतीय आणि एक विदेशी यष्टीरक्षक आहेत ज्यामध्ये क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलचा समावेश आहे.

२ दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सकडे आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आहे. एवढेच नाही तर या संघात आणखी एक भारतीय कीपर केएस भरत आहे. परदेशी यष्टीरक्षकांबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीकडे न्यूझीलंडचा टिम सेफर्टही आहे.

१ चेन्नई सुपर किंग्ज
चेन्नई सुपर किंग्स ही एकमेव फ्रँचायझी आहे ज्यात ५ विकेटकीपर आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी व्यतिरिक्त, रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू या तगड्या त्रिकूटा मुळे हा संघ मजबूत आहे. दुसरीकडे, डेव्हॉन कॉनवे आणि नारायण जगदीसन हे सीएसकेच्या यष्टिरक्षण विभागासाठी खूप आश्वासक ठरू शकतात.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप