साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या अभिनयाच्या जादूने सजलेला पुष्पा हा सिनेमा देश-विदेशात धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटातील काही कडक डायलॉग्स, जस की, “में झुकेगा नहीं साला!!! ” “पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या? में फ्लॉवर नहीं फायर है!” यांवर वेगवेगळे रिल्स बनवायचा मोह कित्येक सेलिब्रेटींना टाळता आला नाही.
डायलॉग बरोबरच यातली गाणी आणि डान्सच्या हुक स्टेप्सच क्रेझ भारताबाहेरही तितकंच लोकप्रिय होताना दिसत आहे. तरूण पिढी तर अल्लू अर्जुनच्या अभिनयाच्या आणि ‘रफ अँड टफ’ अँटीट्यूटच्या चांगलीच प्रेमात पडली आहे. सर्वांकडून पुष्पाची स्टारकास्ट, त्याची टीम यांवर कौतुकाचा वर्षांव होताना पाहायला मिळत आहे. पण अस असून देखील सुपरस्टार अल्लू अर्जुन मात्र सध्या एका वेगळ्याच गोष्टीच्या प्रेमात पडल्याचं दिसतंय.!
View this post on Instagram
अल्लू अर्जुन आणि पुष्पा सिनेमातील इतर मंडळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि यशासाठी देश-विदेशात फिरतीवर होते. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुन दुबईत होता. तेथील एक फोटो त्याने शेअर केला होता. पण तेथे तो प्रमोशन साठी गेला होता की विश्रांतीसाठी गेला होता, याबद्दल अजून खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून स्पष्ट झालेले नाही. किंबहुना असं असलं तरी अल्लू अर्जुन अखेर १६ दिवसांनंतर दुबईहून घरी परतला. त्यावेळी त्याची लहान मुलगी अरहा हिने त्याचं खूपच गोड पद्धतीने स्वागत केलं. तिच्या या स्वागताने अल्लू अर्जुन भारावून गेला आहे.
अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम हँडलवरून, त्याच्या मुलीने त्याचे घरी नक्की कसे स्वागत केले हे सांगणारा एक फोटो सर्व चाहत्यांसोबत शेअर केलेला. फोटोत घरामध्ये अरहाने फुलांच्या सजावटीमध्ये ‘वेलकम नाना’ अशी अक्षरं लिहिली होती. हा फोटो चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरला असून त्यावर तुफान लाईक्स आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, पुष्पा चित्रपट १७ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, एकाच वेळी तो चार भाषांमध्ये डब करण्यात आला आणि तो सर्वात मोठा ब्लॉकबस्टर हिट ठरला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर ही त्याला भरभरून प्रसिसाद मिळाला. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाला सर्वच स्तरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. सेलिब्रिटींपासून ते समीक्षकांपर्यंत आणि चाहत्यांपर्यंत सगळेच ‘पुष्पा’चे फॅन झाले आहेत. त्यामुळे ‘पुष्पा: द रूल’ हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रदर्शित होण्याची दाट शक्यता सिनेवर्तुळात सुरू असल्याचे समजते.