अल्लू अर्जुनची पत्नी गोवाच्या बीचवर करतीये धमाल, सोशल मिडीयावर व्हिडिओ झाले व्हायरल..!

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे सध्या जगभरात चर्चेत आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पुष्पांने धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अल्लू अर्जूनच्या लोकप्रियतेत अजूनच भर पडली आहे. तसेच त्याच्या संबंधित प्रत्येक बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. यादरम्यान आता अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा रेड्डीचे (allu arjun wife sneha reddy) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अल्लू अर्जून नुकताच त्याची बायको आणि मुलांसोबत गोव्याच्या व्हेकेशन वरून घरी परतला आहे. मात्र, अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा रेड्डी अजूनही गोव्याच्या प्रेमात असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर ती सातत्याने गोव्याच्या व्हेकेशन दरम्यानचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. यामध्ये स्नेहा तिचा पती अल्लू अर्जून आणि तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत गोवा ट्रिप खूपच एन्जॉय केल्याचे दिसत आहे.

स्नेहा रेड्डीने शेअर केलेल्या एका व्हिडिओत तिने गोवा व्हॅकेशनदरम्यानचे अनेक फोटो एकत्र करून त्याचा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओतील फोटोंमध्ये ती, तिचा पती आणि फ्रेंड्ससोबत वेगवेगळ्या पोझ देताना दिसून येत आहे. तसेच दुसऱ्या एका व्हिडिओत ती बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. सध्या तिचे हे व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

दरम्यान, अल्लू अर्जून सिनेसृष्टीतील प्रसिद्ध घराण्यातील मुलगा आहे. त्याचे आजोबा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. तर अल्लू अर्जूनचे वडिल अल्लू अरविंद मोठे निर्माता आहेत. तसेच साऊथ मेगास्टार चिरंजीवी यांचा तो भाचा आहे. मात्र, आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्लू अर्जूनने सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज अल्लू अर्जून लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

अल्लू अर्जूनने ‘गंगोत्री’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र, ‘आर्या’ या चित्रपटातील चॉकलेट बॉयच्या इमेजमुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. तेलुगूसोबत त्याचे हिंदीतही अनेक फॅन्स आहेत. तरुणाई मध्ये अल्लूची फारच क्रेझ आहे! हिंदीत डब केलेले त्याचे अनेक चित्रपट टीव्हीवर खूप पाहिले जातात. आता त्याचा ‘पुष्पा’ हा चित्रपट तेलुगूसह तमिळ, कन्नड, मल्याळम सह हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला. त्यामुळे त्याच्या हिंदी चाहत्यांची अल्लू अर्जूनला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा पूर्ण झाली.

दरम्यान, अल्लू अर्जूनने ६ मार्च २०११ रोजी स्नेहा रेड्डीसोबत लग्न केले. त्यानंतर ३ एप्रिल २०१४ रोजी त्यांचा पहिला मुलगा अयान याचा जन्म झाला. त्यानंतर दोन वर्षांनी २०१६ मध्ये मुलगी अरहाचा जन्म झाला. स्नेहा आणि अर्जून नेहमी त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसून येतात. तसेच अनेकदा ते त्यांच्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत असते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप