IPL मुळे सक्के दोस्त झाले पक्के वैरी, सायमंड्स आणि क्लार्कच्या मैत्रीत या कारणामुळे आला मोठा दुरावा..!

ऑस्ट्रेलिया चा माजी क्रिकेट पटू अँड्र्यू सायमंड्स चा शनिवारी रात्री कार अपघातात मृत्यू झाला आहे. एकेकाळी ऑस्ट्रेलिया च्या स्टार खेळाडूं च्या यादीत या खेळाडू चा समावेश होता. आयपीएल च्या पहिल्या सत्रात तो सर्वाधिक महाग विकला जाणारा परदेशी खेळाडू ठरला होता. त्याला डेक्कन चार्जर्स ने ५.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र सायमंड्ला आयपीएल मध्ये मिळाले ल्या पैशां मुळे त्याच्या मायकल क्लार्क सोबत च्या मैत्रीत दुरावा आला होता. खुद्द सायमंड्स ने हा दावा केला होता.

अँड्र्यू सायमंड आणि मायकेल क्लार्क यांनी दीर्घकाळ एकत्र क्रिकेट खेळले आहे. हे दोघे खूप चांगले मित्र होते. या दोन्ही क्रिकेट पटू मध्ये बराच काळ संपर्क नव्हता. सायमंड्स च्या मते याचे कारण आयपीएल होते. सायमंड्स ने या वर्षा च्या सुरुवातीला ब्रेट ली पॉडकास्ट शो मध्ये स्वत: आणि क्लार्क मधील भांडणा ची कारणे उघड केली होती. सायमंड्स म्हनाला, मला वाटते की पैसा खूप विचित्र गोष्टी निर्माण करतो. पैसा चांगला आहे पण ते विष देखील असू शकते. या पैशा मुळे आमची मैत्री तुटली असे मला वाटते. मला त्याच्या बद्दल पुरेसा आदर आहे. त्या मुळे मी जास्त खोलात जाणार नाही. माझी आता त्याच्या शी मैत्री राहिलेली नाही आणि मी या गोष्टी बद्दल कंफर्टेबल आहे. मला इथे बसून त्याच्या वर चिखलफेक करायची नाही.

सायमंड् ने ब्रेट ली सोबत च्या संभाषणात इतके संकेत दिले होते की, सायमंड् ला आयपीएल मध्ये एवढी मोठी किंमत मिळाल्या वर ते क्लार्क आवडले नाही. या मुळेच नंतर या दोघां मधील मतभेदा च्या बातम्या येऊ लागल्या होत्या. कर्णधार झाल्या नंतर संघा च्या बैठकीला उपस्थित न राहिल्या मुळे क्लार्क ने अँड्र्यू सायमंड् ला वनडे मालिकेतून वगळले तेव्हा दोघा मधील वाद पहिल्यांदा सर्वा समोर आला होता. या नंतर सायमंड्स ने अनेक वेळा क्लार्क च्या कर्णधार पदा वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप