“नजर हटी दुर्घटना घटी” वयाच्या ४६ व्या वर्षी अँड्र्यू सायमंड्चे धक्कादायक निधन..!

क्रिकेट विश्वात सध्या आयपीएल च्या १५ व्या सीझनची उत्सुकता क्रिकेटप्रेमीं मध्ये जोरात सुरू आहे. यादरम्यान क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सने जगाचा निरोप घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूं पैकी एक असलेल्या अँड्र्यू सायमंड्सने वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी कार अपघातात जगाचा निरोप घेतला. ही घटना ऐकून क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी जगाचा अखेरचा निरोप घेतला होता, त्यानंतर आता त्याचा सहकारी अँड्र्यू सायमंड्सनेही जगाचा निरोप घेतला आहे. अँड्र्यू सायमंड्सने वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी अखेरचा निरोप घेतल्या नंतर केवळ ऑस्ट्रेलिया क्रिकेटच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.

वृत्तानुसार, शनिवारी रात्री ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविले येथे त्याची कार रस्त्यावरून खाली गेली होती, त्यानंतर कारला धडक बसल्या नंतर कारचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अँड्र्यू सायमंड्सचा मृत्यू झाला होता. या वृत्तानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर जारी करण्यात आलेल्या एका पोलीस निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक माहितीवरून असे दिसून आले आहे की, एलिस रिव्हर ब्रिज जवळ हर्वे रेंज रोडवर रात्री ११ वाजल्यानंतर (ऑस्ट्रेलियाच्या वेळेनुसार) तो कार चालवत होता. रस्त्या वरून कार खाली गेल्यानंतर कार उलटली आणि हा अपघात झाला. आपत्कालीन सेवेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक क्रॅश युनिट अजून तपास करत आहे.

न्यूज कॉर्पच्या अहवालानुसार, सायमंड्सच्या कुटुंबाने त्याच्या मृत्यूची पुष्टी करणारे एक विधान जारी केले आणि लोकांच्या सहानुभूती आणि शुभेच्छांचे कौतुक केले व त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्यास सांगितले. आम्ही तुम्हाला सांगतो की एंड्रयू सायमंड्स ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन टीमचा एक विशेष सदस्य होता, जो त्याच्या जबरदस्त तुफानी फलंदाजी सोबतच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणा साठी ओळखला जात होता. त्याने ऑस्ट्रेलिया साठी १९८ एकदिवसीय, २६ कसोटी आणि १४ टी-२० सामने खेळले आहेत. तो २००३ आणि २००७ मध्ये ऑस्ट्रेलिया च्या एकदिवसीय विश्वचषक चॅम्पियन संघाचा विशेष सदस्य होता.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप