खेळ कोणताही असो खेळाडूंसाठी त्यापेक्षा महत्त्वाचे काहीही असू शकत नाही. क्रिकेटच्या खेळातही असेच घडते. भारतीय संघातील काही खेळाडू आपल्या अभिमानात इतके मग्न होतात की ते खेळापेक्षा स्वतःला जास्त महत्त्व देऊ लागतात. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही अशा ३ भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे स्वतःला खेळापेक्षा मोठे समजतात.
हरभजन सिंग –: शानदार फिरकी गोलंदाजा पैकी एक भारतीय संघाचा खेळाडू हरभजन सिंगने खूप नाव कमावले आहे. पण तो २०१६ सालापासून भारतीय संघातून बाहेर आहे. तो आयपीएल खेळताना दिसत असला तरी त्याचा फॉर्म काही खास नाही. भज्जी मैदाना वर सराव करण्यास टाळाटाळ करायचा. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवरही परिणाम झाला आहे. भारतीय संघाचा खेळाडू भज्जी स्वत:ला खेळापेक्षा महत्त्वाचा मानतो.
View this post on Instagram
हार्दिक पांड्या -: भारतीय संघाचा सध्याचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा यशस्वी क्रिकेटपटू पैकी एक आहे. कपिल देव आणि इरफान पठाण (IRFAN PATHAN) यांना भारतीय क्रिकेट च्या इतिहासातील सर्वात शक्ति शाली अष्टपैलू होण्याचा मान आहे. यानंतर सध्याचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मध्ये ही असेच गुण पाहायला मिळतात. हार्दिक पांड्याने भारता साठी अनेक सामन्या मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी केली असली तरी पंड्या काही वर्षांपासून त्याच्या खराब फॉर्म मध्ये आहे.
हार्दिक काही दिवसा पासून त्याच्या फिटनेसच्या समस्येशी झुंजत आहे. त्याला गोलंदाजी करताना त्रास होत आहे. फिटनेसच्या समस्येवर मात करत त्याने पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवले, पण तरीही तो गोलंदाजीत तितका प्रभावी दिसत न्हवता. भारतीय खेळाडू हार्दिक पंड्या आपला फिटनेस सिद्ध करण्यासाठी एकही देशांतर्गत क्रिकेट सामना खेळत नाही किंवा तो नेटमध्ये गोलंदाजीला जास्त महत्त्व देत नाही. त्यामुळे त्याला कसोटीतील आपले स्थान गमवावे लागले आहे, आता त्याला खेळापेक्षा मोठा समजण्याची ही वृत्ती अधिक नुकसान करू शकते.
कृणाल पांड्या –: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पाठोपाठ त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्याही येतो. सध्या कृणाल पंड्याचा भारतीय मर्यादित षटकांच्या संघात समावेश आहे, त्याला काही सामने खेळण्याची संधीही मिळाली आहे. त्याने आतापर्यंत कोणतीही विशेष कामगिरी दाखवलेली नाही. पण तरीही या खेळापेक्षा तो स्वत:ला मोठा समजण्याची उदाहरणे वेळोवेळी देत आला आहे.